Advertisement

महाराष्ट्र राज्यात भाजपा ओबीसी आघाडीचे कार्य सर्वोत्तम - रामभाऊ दिवटे

महाराष्ट्र राज्यात भाजपा ओबीसी आघाडीचे कार्य सर्वोत्तम – रामभाऊ दिवटे

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – संघटन मजबूत असेल तरच अशक्यप्राय गोष्टीही सहज शक्य होत असतात. हीच बाब शिरोधार्य मानत भाजपा ओबीसी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश उर्फ अण्णा टिळेकर यांनी संघटन मजबुतीवर भर दिला. परिणामी आज महाराष्ट्रात ओबीसी आघाडी संघटनेचे कार्य उत्तम ठरले आहे. याच कार्याची दखल घेत रामटेक विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आणि भाजपा ओबीसी आघाडीचे नागपूर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे यांनी योगेश टिळेकर यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.

यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. ओबीसी आघाडी महाराष्ट्र प्रदेशचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला . यावेळी योगेश टिळेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाजासाठी सुरू असलेल्या सर्व कार्याची माहिती दिली. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, याचीही काळजी दोन्ही सरकार घेत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले . नागपूर जिल्ह्यात भाजपा ओबीसी आघाडीचे महामंत्री रामभाऊ दिवटे यांचेही कार्य उत्तम असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी त्यांच्याही कार्याची प्रशंसा केली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या