Advertisement

दिवाळी निमित्ताने गोगाव येथे हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

दिवाळी निमित्ताने गोगाव येथे हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

माजी जि. प. सदस्य प्रमोद भाऊ चिमूरकर यांच्या अध्यक्षतेत उद्घाटन संपन्न

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील गोगाव येथील मी मराठा क्रिकेट क्लब गोगाव यांच्या वतीने खास दीपावलीच्या शुभ पर्वावर सांस्कृतिक भवन ग्रामपंचायत गोगावच्या भव्य आवारात हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यात आलं आहे.
या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून गोगावं येथील सरपंच जयश्रीताई दोडके ह्या उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर हे खास उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तुळशीरामजी वाकडे माझी सरपंच गोगाव, जितुभाऊ भजगवडी उपसरपंच गोगाव, मनोहर भोयर अध्यक्ष तंटामुक्ती समिती गोगाव, चेतन गोंदाडे ग्रा.पं. सदस्य, संतोष डांगे ग्रा.पं. सदस्य, श्यामसुंदर दडमल ग्रा.पं. सदस्य, मारोतराव भोयर, हेमंत रहाटे डाटा एन्ट्री ऑपरेटर गोगाव, छबुताई रामटेके व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोद चिमूरकर म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये हाप पीच क्रिकेट स्पर्धांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केल्या जातं असते. मागील दोन-तीन वर्ष कोरोनात गेल्यामुळे यामधे खंड पडला होता. ग्रामीण लोकांचा मनोरंजन व गाव खेड्यातील नवीन खेळाडूंसाठी या स्पर्धा उत्साहवर्धक ठरत असतात. अशा स्पर्धांमधून उत्तम खेळाडू तयार व्हावेत असे मला वाटते. ही स्पर्धा ग्रामीण खेळाडूंना प्रेरणादायी ठरावी. असे प्रतिवादन यावेळी केले.
ही स्पर्धा 10 षटकांची असेल. एका संघात 9 खेळाडूंचा समावेश राहील. या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघास 11 हजार रोख व चषक, द्वितीय पारितोषिक 8 हजार रुपये रोख व चषक तर तृतीय पारितोषिक 6 हजार रुपये रोख व चषक देण्यात येईल. त्याचबरोबर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजाला तसेच अनेक पारितोषिक ठेवले आहेत. या स्पर्धेदरम्यान मी मराठा क्रिकेट क्लब गोगाव च्या वतीने 26 ऑक्टोबरला डान्स हंगामा आयोजन करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या