Advertisement

वाघाच्या हल्ल्यात महीला ठार

!वाघाच्या हल्ल्यात महीला ठार.!

ब्रम्हपुरी-तालुक्यातील हळदा येथील शेताशिवरात वाघाच्या हल्ल्यात महीला ठार झाल्याची खळबळजनक घटना दिनांक २०/१०/२०२२ रोजी दुपारी२:०० वाजताच्या सुमारास घडली. रूपा रामचंद्र मस्के वय वर्षे ४० असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या महीलेचे नाव असुन हळदा येथील रहिवाशी आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, रुपा हि स्वतःच्या शेतात जनावरांसाठी गवत कापायाला गेली शेत हे जंगलालगत असल्याने बांधा आड दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने रूपा रामचंद्र म्हस्के वर हल्ला चढवून ठार केले.

मृतक महिलेच्या पश्चात ३ मुले आणि पती आहे असा आप्त परिवार आहे. रूपाच्या जाण्याने मस्के कुटुंबावर मोठ दुःखाच डोंगर कोसळले आहे. तसेच गाव परिसर शोकसागरात बुडालेला आहे.

संभाव्य नरभक्षक वाघाचे धोके लक्षात घेता संबधित वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी व मस्के कुटुंबीयांनी केली आहे.

प्रतिनिधी: राहुल भोयर,ब्रम्हपुरी-चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या