Advertisement

निलज ग्रामपंचायत च्या मनरेगा योजनेची आणि विविध कामाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

निलज ग्रामपंचायत च्या मनरेगा योजनेची आणि विविध कामाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

गावकऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी , उपजिल्हाधिकारी , तहसीलदार आणि संबंधित अधिकार्यांना निवेदन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

निलज-खंडाला (कन्हान) :- कन्हान शहारा पासुन काही अंतरावर असलेल्या निलज ग्रामपंचायत येथे प्रशासनाने , सरपंचा आशाबाई पाहुणे यांचा मुलगा रोजगार सेवक व ग्रापंचायत कर्मचारी यांनी मनरेगा योजनेत खुप मोठा भ्रष्टाचार केला असुन ग्रामपंचायत कर्मचारी पदभरती विषय मार्गी न लावल्याने आणि सरपंचा आशाबाई पाहुणे यांनी आपल्या मुलास कार्यालयीन शिपाई व उपसरपंच पंकज टोहने यांनी भावास पाणी पुरवठा शिपाई पद्दी नियम बाहय नियुक्ती करुन ग्रामसेवकांने शासन निर्णयाचे अधिन सभेत योग्य मार्गदर्शन न केल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र चकोले यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी , उपजिल्हाधिकारी , तहसीलदार , गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकार्यांना भेटुन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन निलज सरपंचा, ग्रामसेवक, रोजगार सेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

निलज ग्राम पंचायत हे गाव विरोधी पक्ष गट नेते जि.प सदस्य व्यंकटेश कारेमोरे यांचे गाव असुन गेल्या दहा वर्षापासुन ग्राम पंचायतीवर त्यांचा पक्षाचे वर्चस्व आहे. परंतु आता निलज गावातील नागरिकांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे .

मिळालेल्या माहिती नुसार दि.२३ ऑक्टोंबर २०२० रोजी ग्रामपंचायत निलज येथे कार्यालयीन शिपाई व पाणी पुरवठा शिपाई म्हणुन तत्कालीन ग्राम पंचायत सदस्या व विद्यमान सरपंचा आशाबाई मोरेश्वर पाहुणे यांनी आपला मुलगा रोमन पाहुणे यास कार्यालयीन शिपाई व उपसरपंच पंकज टोहने यांनी आपल्या भावास पाणी पुरवठा शिपाई म्हणुन नियुक्त केले होते. या दरम्यान एकुण १५ अर्जदारांनी शिपाई पदाकरिता अर्ज केले होते. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता ग्रामपंचायत शिपाई नियुक्ती प्रक्रिया पुर्ण करण्यात आल्याने संतापलेल्या अर्जदारांनी गट विकास अधिकारी पारशिवनी यांना या विषयी तक्रार केल्याने तत्कालीन गट विकास अधिकारी मा.खाडे साहेब यांनी चौकशीचे आदेश देत मनोजकुमार सहारे विस्तार अधिकारी प.स.पारशिवनी यांची चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती केली होती. मा.सहारे यांनी आपल्या चौकशी अहवालात मुंबई ग्रामपंचायत नौकरां बाबत (सेवा प्रवेश आणि सेवेचा शर्ती) नियम १९६० पोट नियम ४ व ४-अ- २ अन्वये भर्ती प्रक्रिया राबविण्यात आली . परंतु महाराष्ट्र शासन सामन्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रा नि म१२१५ (प्र.क्र.१०९ १५)१३ – अ दि.५ ऑक्टोम्बर २०१५ मधील परिच्छेद २ व ३ अन्वये शासन निर्णयानुसार कर्मचारी भर्ती प्रक्रिया नियमा नुसार पार पाडली नाही. शासन निर्णयानुसार लेखी आणि मौखिक परीक्षा घेणे अनिवार्य होते परंतु तसे केले गेले नाही शासन निर्णयाचे अधिन राहुन सचिवाने सभेत योग्य मार्गदर्शन केले नाही . त्या अनुषंगाने झालेली भर्ती प्रक्रिया नियम बाह्य ठरते असे स्पष्ट चौकशी अहवालात नमुद केले. सदर प्रक्रियेवर तत्कालीन गट विकास अधिकारी अशोक खाडे यांनी स्थगिती दिली . परंतु तत्कालीन चौकशी अधिकारी सहारे यांच्यावर राजकीय दबाव आणुन सदर प्रकरण थंड बस्त्यात ठेवलं आणि साहारे यांना माऊली जि प क्षेत्रात बदली केल्याने त्या कर्मचाऱ्यांना आजपावत पदावरून काढण्यात आले नाही. त्यामुळे अर्जदारांना न्याय कधी मिळणार असा सवाल गावकऱ्यांनी शासन प्रशासन ला केला आहे .

मनरेगा योजनेची सखोल चौकशी करा – नागरिक

निलज गावा मध्ये मनरेगा योजनेत जे कधी कामाला जात नाही अश्या लोकांच्या खात्यात पैसे जमा होणे हे मनरेगा योजनेतील भ्रष्टाचार चा दाखला असुन काही लोक जी NTPC व इतर कंपन्या मध्ये कामाला जातात अश्या लोकांचा खात्यात पैसे जमा होत आहे. ज्यांना कामाची गरज असुन जे बेरोजगार आहे त्यांना मनरेगा योजने मध्ये काम देण्यास रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी रोमण पाहुणे हा काम देण्यास टाळटाळ करत असुन त्याचा असभ्य, अरेरावी स्वभावामुळे संपुर्ण ग्रामस्थ त्रस्त आहे . ग्राम पंचायत कर्मचारी निवड प्रक्रिया ही नियम बाह्य झाल्याचे तत्कालीन गट विकास अधिकारी यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले परंतू रोमण पाहुणे याची आई ही सरपंच असल्यामुळे त्याचावर कोणतीही कारवाई झाली नाही. एकाच व्यक्तीकडे रोजगार सेवक व ग्राप कर्मचारी पद असल्यामुळे गावातील नागरिक संभ्रमात आहे . तो दोन्ही पदावर असल्याने विविध समस्यां निर्माण झाल्याने ग्रामस्थांना सामोरे जावं लागत आहे .
राजकीय मतभेद करून प्रशासनाचे कामकाज चालविने , मनरेगा योजनेत जे कधी कामाला जात नाही अश्या लोकांची नावे मस्टर वर चढवून त्यांना योजनेचा लाभ देणे , ग्राम पंचायत मध्ये पक्षपात करून योजनांची अंमलबजावणी करणे , अरेरावी ची भाषा, व असभ्य वर्तनुक करणे अश्या ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंघळ कारोभारा मुळे गावातील नागरिक त्रस्त झाल्याने तसेच त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करून मनरेगा योजने ची चौकशी करण्याचा मागणी करिता
गट विकास अधिकारी , पंचायत समिति पारशिवनी अधिकारी , तहसीलदार प्रशांत सांगडे पाराशीवनी यांना निवेदन दिले होते परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही .

मनरेगा विषयी चर्चा , ग्रामपंचायत शिपाई पदावरील चर्चा , अपंग निधी वाटप या विषयी चर्चा आणि 2020-21 , 2021-22 2022-23 या वर्षाचे संपूर्ण जमा, खर्च हिशोब देणे बाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेची मागणी केली असता टाळटाळ केली जात असल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ता रविंद्र चकोले यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद नागपुर चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.योगेश कुंभेजकर , उपजिल्हाधिकारी सौ. विजया बनकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.विपुल जाधव , पंचायत आणि मनरेगा विभाग बीडीओ मा.स्वप्निल मेश्राम , तहसीलदार प्रशांत सांगडे सह संबंधित विभागाच्या अधिकार्यांना निवेदन देऊन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता मनरेगा योजनेची आणि विविध कामाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करिता तुम्ही स्वता नियुक्त केलेले अधिकारी पाठवावे व दोषींवर कडक कारवाई करुन निलज गावातील ग्रामस्थांना योग्य न्याय मिळुन द्यावा अशी मागणी केली आहे . जर सात दिवसात कुठल्याची प्रकारची कारवाई न केल्यास जन आणि रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे .

या प्रसंगी निवेदन देतांना रविन्द्र चकोले , अशोक हटवार , रामचंद्र चकोले , प्रभाकर चकोले ,प्रदीप चकोले , रविन्द्र दुपारे , अंकुश चकोले , राजेंद्र चांदे मेश्राम , दिपक भुते , दिलीप पाहूणे , सह आदि नागरिक उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या