Advertisement

भारतीय बौद्ध महासभा व्दारे दोन दिवसीय धम्म महोत्सव साजरा

भारतीय बौद्ध महासभा व्दारे दोन दिवसीय धम्म महोत्सव साजरा

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान  – परिसरातील वाघोली गावात ६६ वा धम्मचक्र परिवर्तन दिवस महोत्सवा निमित्य पहिल्या दिवसी प्रबोधना चा कार्यक्रम व दुसऱ्या दिवसी नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वर भव्य भोजनदान करून भारतीय बौद्ध महासभा व्दारे दोन दिवसीय धम्म महोत्सव साजरा  करण्यात आला.

भारतीय बौद्ध महासभा व्दारे मंगळवार (दि.४) ऑक्टोंबर ला ६६ वा धम्मचक्र परिवर्तन दिवसाच्या पुर्व संध्येला वाघोली गावात पहिल्या दिवसी प्रसिध्द  प्रबोधनकार विजयजी भारती यांचा सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाने सुरूवात करण्यात आली. दुसऱ्या दिवसी बुधवार (दि.५) ला नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वरून नागपुर च्या ऐतिहासिक दिक्षा भुमिवर देश , विदेश आणि विविध राज्यातुन येणाऱ्या धम्म प्रेमी यां करिता सकाळी चना , पोहा चा नास्ता व सकाळी ८ वाजता पासुन वाघोली बस स्टापवर भव्य भोजनदान करण्यात आले. या कार्यक्रमाचा हजारो धम्म प्रेमीनी लाभ घेतला . या कार्यक्रमास वाघोली, गोंडेगाव, घाटरोहणा, वराडा, टेकाडी, नांदगाव, एसंबा, साटक, बनपुरी, तेलनखेड़ी, बोरडा, नीमखेड़ा, गहुहिवरा, खंडाळा, निलज, बखारी, डुमरी, मेहंदी आदी गावा ने सहभाग घेतला .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भारतीय बौद्ध महासभा चे ज्येष्ठ नेते श्री सिद्धार्थ कांबळे , सामाजिक समाजसेवक चंद्रमणी पाटिल, प्रयास कांबळे, बाबुलाल प्रसाद, रतन भेलावे, दिवाकर पौनिकर, विनोद रंगारी, शेखर पौनिकर, राजु मेश्राम, दिगांबर ठाकरे, पुंडलिक मेश्राम, प्रकाश वरकडे, सूर्यभान दीपके, देवा डोंगरे उपसरपंच निमखेडा, दिनेश रंगारी, मिलिंद देशभ्रतार सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या