इंदिरा नगर कन्हान येथुन दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने केली चोरी
फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत इंदिरा नगर येथुन प्रमोद काकडे यांच्या घराच्या गेट समोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने दुचाकी वाहन किंमत ५०,००० रु. चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दि.१० आॅक्टोंबर ला सायंकाळी ६:३० ते ७:३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी प्रमोद रंगराव काकडे वय ३८ वर्ष रा.इंदिरा नगर कन्हान हे आपल्या शेतावरुन काम आपटुन घरी परत आले असता त्यांनी आपली दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० एफ ९९३० आपल्या घराच्या गेटचा समोर हॅंन्डल लाॅक करुन घरात गेले व आंघोळ करुन साई मंदिर येथे जाणे असल्याने तयारी करुन अर्ध्या तासात परत आले असता प्रमोद काकडे यांना घराच्या गेट समोर दुचाकी वाहन दिसुन न आल्याने त्यांनी परिसरात आजु बाजुला शोध घेतला असता मिळुन न आल्याने दुचाकी वाहन क्रमांक ४० एफ ९९३० इंजिन क्रमांक एचएई १० ईनडीएचजी १८७०४ , चेसीस नंबर एमबीएलएचए१०एडब्लुडीएचजीओ४०९० किंमत ५०,००० रु. कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रमोद काकडे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप.क्र ५९३२२ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .


0 टिप्पण्या