श्रावणबाळ लाभार्थ्याांचे थकीत ६ महिन्याचे अनुदान त्वरित देण्याची मागणी
माजी खासदार व ग्रामौन्नती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश जाधव , पदाधिकारी आणि नागरिकांचे तहसीलदार मार्फत सरकार ला निवेदन
कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील श्रावणबाळ योजना अंतर्गत पंधराशे लाभार्थ्यांना मिळणारे साहयता अनुदान मागील सहा महिन्या पासुन मिळाले नसल्याने दिवाळी सुध्दा अंधारात दिसत असल्याने तालुक्यातील श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांचे थकीत सहाय्यता अनुदान त्वरित देण्याची मागणी
शिवसेना माजी खासदार व ग्रामौन्नती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व नागरिकांनी तहसीलदारा प्रशांत सांगळे यांच्या मार्फत शासना ला निवेदन पाठवुन केली आहे .
कुणाचाही आधार नसलेल्या वयोवृध्द नागरिकांना शासना व्दारे श्रावण बाळ योजने अंतर्गत आर्थिक सहाय्यता अनुदान प्रदान करण्यात येते. परंतु एप्रिल-२०२२ पासुन चे आता पर्यंत ६ महिन्याचे अनुदान मिळाले नसल्याने ते थकीत आहे. दिवाळी सारख्या सणाला सुध्दा अनुदान प्राप्त न झाल्याने वयोवृध्द नागरिकांनी आपल्या व्यथा शिवसेना माजी खासदार व ग्रामौन्नती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाश भाऊ जाधव हयाना सांगितल्याने शुक्रवार (दि.२१) ऑक्टोंबर ला श्रावणबाळ योजना लाभार्थी वयोवृध्दासह पारशिवनी तहसीलदार मा.प्रशांत सांगळे यांची तहसील कार्यालयात भेट घेऊन चर्चा करून पारशिवनी तालुक्यातील १५०० श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांचे थकीत ६-महिन्याचे सहाय्यता अनुदान त्वरित देण्याची मागणी शिवसेना माजी खासदार व ग्रामौन्नती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व नागरिकांनी तहसीलदारा प्रशांत सांगळे यांच्या मार्फत शासना ला निवेदन पाठवुन केली आहे .
या प्रसंगी नायब तहसीलदार मा. रणजित दुसावार , नायब तहसीलदार श्री आडे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिष्टमंडळात मा. मोतीराम रहाटे, प्रविण गोडे , सचिन साळवी , कमलजी पालीवाल , प्रदीप वानखेडे , कैलास खंडार , रविंद्र चौधरी , विशाल सहारे , वयोवृध्द लाभार्थी शामराव सरोदे , हरीचंद हारगुळे , मनोहर दमाये , शोभा पानतावने , रमाबाई वानखेड़े , उषा शेंन्डे , मुरलीधर कारस्कर , सुर्यभान तिजारे , नामदेव होले , शेख सुलेमान , खातुमभी शेख , रमेश हारगुळे आदि ने नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
प्रतिनिधि – ॠषभ बावनकर,कन्हान


0 टिप्पण्या