Advertisement

टेकाडी शिवारात बिबटया चा हल्यात जर्शी कारवळ ठार

टेकाडी शिवारात बिबटया चा हल्यात जर्शी कारवळ ठार

परिसरात बिबटयाच्या हल्याने नागरिकांन मध्ये चांगलेच भितीचे वातावरण

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – शहरातील टेकाडी शिवारातील रामेश्वर नाला जवळील टेकाडी कोळसा खदान नं.६ रस्त्या लगत च्या शेतात जांबाच्या झाडाखाली बांधलेली पाळीव गाई पैकी एका जर्शी कारवळ गाई वर बिबटयाने शिकार करून तिला ठार केल्याने पशु पालक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन परिसरात बिबटयाच्या हल्याने चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

दिड वर्षा पासुन कन्हान व पेंच नदी काठाच्या अलीकडील गावात वन्य प्राणी बिबटयाने धुमाकुळ घालीत पिपरी, गाडेघाट, जुनिकामठी, घाटरोहणा, गोंडेगाव, टेकाडी, वराडा, एसंबा, नांदगाव, बखारी, मेंहदी गावातील शेत शिवारात अनेक प्राळीव प्राणी जसे कुत्रा, बकरी, जर्शी कारवळ, गोरे यांचे वर रात्री हल्ला करून शिकार करित जवळपास ५० च्या वर प्राळीव प्राण्याची बिबटयाने शिकार करून ठार केले असुन सुध्दा वन विभाग या बिबटयाचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरले आहे. तसेच बिबट आता लोकवस्ती जवळ येऊन शिकार करित असल्याने परिसरातील ग्रामस्थ शेतकऱ्या मध्ये चांगली भिती निर्माण झाली आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.१०) ऑक्टोंबर ला ग्राम पंचायत टेकाडी (को.ख) अंतर्गत रामेश्वर नाला जवळील टेकाडी कोळसा खदान नं.६ रस्त्या लगतच्या शेतात जांबा च्या झाडाखाली नेहमी प्रमाणे मा. विजय रामदास गुप्ता राह.कांद्री यांनी आपल्या पाळीव गाई बांधुन चारा पाणी करून सायंकाळी घरी गेले. उशीरा रात्री शेताकडे चकर मारायला दुचाकीने आले असता बिबट त्यांच्या काळया भुरटया रंगाच्या जर्शी कारवळ वर हल्ला करून शिकार करून ठार करित होता . दुचाकी च्या प्रकाशाने बिबट पळुन गेला. आजुबाजुच्या लोकांना बोलावुन पोलीसांना माहीती दिल्याने पोलीसांनी येऊन पाहणी केली. रात्र जास्त झाल्याने मृत कारवळ ला बोऱ्याने झाकुन ठेवुन सकाळी वन विभागा व्दारे कार्यवाही करू असे म्हणुन सर्व तेथुन निघुन गेले . सकाळी पशु मालक शेतात येऊन पाहतो तर त्या कारवळ ला पहाटे सकाळी ओढत दुसरी कडे नेऊन बिबटयाने चांगलेच खाल्ले होते . या घटनेची वनविभाग पटगोवारीचे वनरक्षक मा.एस जी टेकाम यांना भ्रमणध्वनीने माहीती दिली. त्वरित वनरक्षक टेकाम यांनी आपले वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्र सहायक यांना माहीती दिल्यावर वन श्रेत्र साहायक, वनरक्षक एस जे ट़ेकाम वारिष्ठाचे आदेशाने वनकर्मी व पंचासह पोहचुन घटना स्थळाचे निरिक्षण करून पंचाच्या साहयाने पंचनामा करून अहवाल वनविभागास पाठवितो असे सांगितले . पिडित शेतकरी पशु मालक विजय गुप्ता यांची दीढ वर्षाची काळा भुरट्या रंगाची पाळीव कारवळ ची वन्य प्राणी बिबटयाने शिकार करून ठार केल्याने पिडीत पशु पालकाला २५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याने गावातील शेतकऱ्यांनी क्षेत्र सहायक आधिकारी व वनरक्षक श्रीकांत टेकाम याच्याशी चर्चा करून वन विभागाने शेतकऱ्याचे झालेले नुकसान २५ हजार रूपये त्वरित भरपाई म्हणुन मोहबदला देण्याची तसेच या बिबटयाचा बंदोबस्त लावण्याची परिसरातील शेतकरी व ग्रामस्थानी मागणी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या