Advertisement

बोर्डा टोल नाका जवळ ईंडीगो कार ची दुचाकी वाहना ला धडक

बोर्डा टोल नाका जवळ ईंडीगो कार ची दुचाकी वाहना ला धडक

महिला किरकोळ जख्मी , दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान

फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील बोर्डा टोल नाका जवळ ईंडीगो कार चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन तु टर्न मारुन दुचाकी वाहना ला समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला किरकोळ जख्मी झाली असुन वाहनांचे मोठे नुकसान झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी दुचाकी वाहन चालका च्या तक्रारी वरून पोस्टे ला कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक २३ आॅक्टोंबर ला सायंकाळी ५:४५ वाजता च्या दरम्यान फिर्यादी सचिन प्रभाकर लांभाडे वय ३९ वर्ष राहणार नागपुर हा आपल्या पत्नी आणि मुला सह दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० सीजी ५७४६ ने नागपुर वरुन पवनी येथे दिवाळी सणा निमित्त नातेवाईका कडे जात असता नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील बोर्डा टोल नाका जवळ नागपुर कडुन मनसर कडे जाणरी ईंडीगो कार क्रमांक एम एच ४० पी ३२५५ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन यु टर्न मारुन सचिन लांभाडे यांच्या दुचाकी वाहना ला समोरुन धडक दिल्याने दुचाकी वाहना वर मागे बसलेली सचिन लांभाडे यांची पत्नी ही खाली पडुन तिच्या हाताला , पायाला , ओटाला किरकोळ मार लागला असुन दुचाकी वाहना चे समोरचे भाग , स्टॅंन्ड तुटफुट होऊन अंदाजे १०,००० रुपयांचे नुकसान झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी दुचाकी वाहन चालक सचिन लांभाडे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला ईंडीगो कार चालका विरुद्ध कलम २७९ , ३३७ भांदवि , मो.वा.अधि कलम १३४ , १३४ बी , २०(१) , १०३ , १७७ , १८४ , अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन ईंडीगो कार चालकाचा शोध घेत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या