Advertisement

महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यायाच्या ऑनलाईन करीयर कट्टा ग्रुप मार्फत एकूण 26 विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तुंग यशस्वी वाटचाल

महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यायाच्या ऑनलाईन करीयर कट्टा ग्रुप मार्फत एकूण 26 विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तुंग यशस्वी वाटचाल

मुखेड : वीरभद्र शिक्षण संस्था संचलित, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, मुखेड. करीयर कट्टा केंद्रा मार्फत गुणवंत व यशस्वी झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार समारंभ आज रोजी पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिने सर हे प्रमुख होते. प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व आपल्या मनोगतात सर्व ग्रामीण विद्यार्थी स्वतःच्या गुणवत्तेवर विश्र्वास ठेऊन जाणीव आणि गुरुजनांच मार्गदर्शन घेऊन स्वतःची प्रगती घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावं,महाविद्यालयाचे करीयर कट्टा केंद्र तुम्हाला तुमच्या करीयर साठी सर्वोत्तोपरी मागदर्शन करण्यासाठी तयार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश जी हांडे यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणातून महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालाय अंतर्गत चालणाऱ्या सर्व उपक्रमाचे तोंड भरून कौतुक करून प्राचार्य डॉ. एस.बी. अडकिने सर आणि करीयर कट्टा टीम चे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे मध्ये यश मिळविण्यासाठी जिद्द,नियोजन बद्ध मेहनत ,योग्य मार्गदर्शन आणि विषयाची नीट नेटकी पूर्व तयारी या चतुसुत्री चा कानमंत्र दिले. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती वी.वी. गोबाडे (पोलीस निरीक्षक, मुखेड ) सर्व महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालायमहात्मा, विद्यार्थ्याचे सर्वात अगोदर अभिनंदन देऊन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि आपल्या मनोगतातून स्वतः कसा घडलो याची आदर्श श्रेष्ठ संदेश देणारी स्वतःची कहानी सांगून विद्यार्थ्याना स्वतः स्वतःचे निर्माते आहात,स्वतःला जाणीव,ज्ञान आणि स्वतःवरील विश्वास असले तर च तो यशस्वी होऊ शकतो..असे बोलतांना संगीत होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संतोष शेंबाळे यांनी केले तर सूत्र संचलन डॉ. डी.के. आहेर सर,डॉ.विजय वारकड सर, सौ. मनिषा देशपांडे मॅडम आणि या कार्यक्रमाचे आभार डॉ.शिव टाले सर यांनी केले  आणि ज्येष्ठ  सर्व मान्यवर प्राध्यापक ,कर्मचारी सर्व विद्यार्थ्याचे पालक आणि पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते.

प्रतिनिधी: प्रशांत पवित्रे, मुखेड-नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या