हळदा घाटावरून अवैध वाहतूक करीत असलेल्या ट्रक जप्त
वाळुघाटातील तील साठा असलेल्या वाळूची नोंद तहसीलदार यांनी साठा वहीत केली का
नदीकाठालगत ज्याठिकाणी वाळूसाठा असेलल्या ठिकाणावर कंत्राटदारांनी दर्शनी भागात जाहीर फलकांवर वाळूसाठ्याची माहिती देणे गरजेचे असतांना नियमबाह्य पध्दतीने अवैध वाळूसाठा जमा केल्याचे सर्वत्र दिसून येत आहे . ही अवैध वाळू हायवा ट्रकच्या माध्यमातून भरधाव वेगाने वाहतूक करून परीसरातील चिखलधोकडा, अऱ्हेरनवरगाव ,पिंपळगाव, नांदगाव हळदा, बेलगाव ,कोलारी आणि कुर्झा रस्ताचे नुकसान केले आहे परिणामी याचा फटका सर्व सामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे .
अवैध वाळू ट्रक हायवा मुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून मोठया प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत आणि त्या खड्ड्यातल्या खराब पाण्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे बऱ्याच वेळा कपडे खराब होत आहेत. या गांभीर्य पूर्वक बाबीकडे दुर्लक्ष न करता तात्काळ संबंधीत विभागाने अवैध वाळू वाहतूक थांबवून रस्ता दुरुस्त करावा अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे .
ब्रह्मपुरी शहरात जागोजागी, चौकाचौकात कॅमेरे लावण्यात आले आहे त्या कॅमेऱ्यात अवैध रेती, मुरूम हायवा, टिप्पर घेउन जात असल्याचे कॅमेरा मध्ये कैद होत नाही का त्या कॅमेऱ्यातील अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक, हायवा यांना सूट दिली जात आहे का
वाळुघाटातील वाळूसाठा असलेल्या वाळूची नोंद तहसीलदार यांनी साठा वहीत केली का.
यासह वाळू साठ्याची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करण्यात येणार काय असे एक नाहि तर अनेक प्रश्न परिसरातील नागरीकांन पुढे उपस्थित झाले आहेत .



0 टिप्पण्या