कन्हान नप द्वारे १०वी आणि १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार कार्यक्रम संपन्न
विधवा महिलांचा मुलां – मुलींना मोफत शालेय साहित्य वाटप
कन्हान प्रतिनिधि - ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – पिपरी नगर परिषद द्वारे १०वी आणि १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार आणि विधवा महिलांचा मुलां – मुलींना मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन नप नवीन इमारत सभागृह येथे करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नगरसेवक , नगरसेविकांना आणि नप अधिकार्यांनी उपस्थित विद्यार्थांना योग्य शिक्षणाबाबत मार्गदर्शन करुन पुढील शिक्षणा करिता शुभेच्छा दिल्या . त्यानंतर १०वी आणि १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा शिल्ड , पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असुन विधवा महिलांचा मुलां – मुलींना मोफत शालेय साहित्य वाटप करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी , नगरसेविका संगीता खोब्रागडे , रेखा टोहणे , गुंफा तिडके , सुषमा चोपकर , वर्षा लोंढे , मोनिका पौणिकर , अनिता पाटील , वंदना कुरडकर , कल्पना नितनवरे , पुष्पा कावडकर , नप अधिकारी शशिकांत मेश्राम , स्थापत्य अभियंता नामदेव माने , स्वास्थ्य निरीक्षक विनोद मेहरोलिया , रविंद्र धोटे , कनिष्ठ लिपिक देवीलाल ठाकुर , उमेश कठाणे , शुभम काळबांधे , रविंद्र पाहुणे , आशिष पात्रे सह आदि नप अधिकारी , कर्मचारी आणि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन शशिकांत मेश्राम यांनी केले


0 टिप्पण्या