Advertisement

गावचा विकास करण्यासाठी केव्हाच मागे हटणार नाही - दामीनीताई चौधरी

गावचा विकास करण्यासाठी केव्हाच मागे हटणार नाही –  दामीनीताई चौधरी

नळांचे अतिक्रमण हटवून ग्रामपंचायत कडून बोरवेल द्वारे पाणीपुरवठयाची सोय करण्यात आली

ब्रम्हपुरी- तालुक्यातील  अर्हेर-नवरगाव हे सर्वांच्याच ओळखीचे गाव आहे.   अर्हेर-नवरगाव हे  तालुक्यात एक  प्रख्यात गाव असून एक रंगीन गाव म्हणून ओळखल्या जाते आणि त्यातही गावची सरपंच एक महिला आहे आणि एवढ्या मोठ्या गावाचा सरपंच पद सांभाळणे म्हणजे अनेक समस्यांना सामोरे जाणे आहे.    त्यांनी गावाच्या विकासासाठी आणि गावाला समृध्दीच्या मार्गाने नेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे.

काही महिन्यांपूर्वी मोफत नळ जोडणी योजना गावामध्ये आली होती, त्यामध्ये खूप प्रमाणात कंत्रादारांकडून मनमर्जी ने नळ हे रस्त्याच्याकडेला लावण्यात आले होते. या नळाच्या अतिक्रमनांमुळे शाळकरी मुलांना व गावकऱ्यांना या रस्त्याने ये – जा करण्यास खूप त्रासदायक ठरत होते. त्यामुळे नळांच्या अतिक्रमणामुळे होणारा त्रास बघता गावच्या सरपंच दामीनी जागेश्वर चौधरी यांनी नळांचे अतिक्रमण हटवून ग्रामपंचायत मार्फत बोरवेल द्वारे पाणीपुरवठयाची सोय उपलब्ध करून दिली. भविष्यात कितीही कठीण परिस्थिती असली तरी अर्हेर-नवरगावचा विकास करण्यासाठी केव्हाच मागे हटणार नाही असे सरपंचा दामीनीताई जागेश्वर चौधरी यांचे कडून सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या