Advertisement

कन्हान ला भाजपा उत्तर आघाडी कार्यकारणीचा विस्तार

कन्हान ला भाजपा उत्तर आघाडी कार्यकारणीचा विस्तार

राजन सिंह यांची अध्यक्ष पद ,तर किरण ठाकुर यांची महामंत्री  पदावर नियुक्ती

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – भाजपा कन्हान शहर द्वारे उत्तर आघाडी कार्यकारणीचा विस्तार करुन राजन सिंह यांची अध्यक्ष पदावर तर किरण ठाकुर यांची महामंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली असुन सोडुन गेलेल्या भाजपा पदाधिकार्यांनी पुन पक्षात प्रवेश केला असुन व नागरिकांनी भाजपा प्रवेश केल्याने भाजपा पदाधिकार्यांनी उत्तर आघाडी नवनियुक्त पदाधिकार्यांचा आणि पक्षात प्रवेश करणाऱ्या युवकांचा दुपट्टा घालुन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला .

भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे शनिवार ला उत्तर आघाडी कार्यकारणीचा विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात आणि भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , व माजी नप नगराध्यक्ष शंकर चहांदे यांच्या उपस्थिती मध्ये उत्तर आघाडी नवनियुक्त पदाधिकार्यांची घोषणा करण्यात आली असुन या मध्ये भाजपा कन्हान शहर उत्तर आघाडी अध्यक्ष पदी राजन सिंह , महामंत्री पदी किरण ठाकुर , शशिधरण नायर , शिरीष त्रिपाठी , उपाध्यक्ष पदी राजु श्रीवास्तव , धीरज देवांगन , अलदीराम कनोजिया सह आदि नागरिकांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.

यावेळी 2019 मध्ये नप परिषद चुनाव दरम्यान भाजपा पक्ष सोडुन गेलेले महेंद्र साबरे , हर्ष , संदीप कभे सह आदिं चा पुन प्रवेश घेण्यात आला असुन इतर युवकांनी सुद्धा भाजप मध्ये प्रवेश केल्याने भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात आणि भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , व माजी नप नगराध्यक्ष शंकर चहांदे यांच्या उपस्थिती मध्ये उत्तर आघाडी नवनियुक्त पदाधिकार्यांचा आणि पक्षात प्रवेश करणाऱ्या युवकांचा दुपट्टा घालुन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला .

या प्रसंगी नगरसेविका सुषमा चोपकर , वर्षा लोंढे , वंदना कुरडकर , अनिता पाटील , सुनंदा दिवटे , सुषमा मस्के , तुलेषा नानवटकर , अमोल साकोरे , संजय रंगारी , विक्की सोलंकी , लीलाधर बर्वे , विनोद किरपान , शैलेश शेळके , ऋषभ बावनकर , सचिन वासनिक , मयुर माटे , कामेश्वर शर्मा , धर्मेंद्र गणवीर , रंजीत शिंदेकर , मनोज कुरडकर , अजय लोंढे , दिपनकर गजभिये , सुरेश चावके ,  सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या