Advertisement

टेकाडी येथे रोग निदान,रक्तदान शिबीर साजरा

टेकाडी येथे रोग निदान , रक्तदान शिबीराने महात्मा ज्योतिबा फुले बहु.संस्थेचा वर्धापन दिवस थाटात साजरा

शिबीरात ३७ रक्तदात्याने केले रक्तदान , तर ७५ रुग्णांनी रोगानिदान शिबाराचा घेतला लाभ

कन्हान  – टेकाडी येथे भव्य रोग निदान, रक्तदान व ऑनलाईन आधार कार्ड, पॅन कार्ड दुरूस्ती शिबीरात नागरिकांना सेवाभावी लाभ करित समाज सुधारक  महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी चा ११ वा वर्धापन दिवस थाटात साजरा करण्यात आला.

समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी गेल्या अनेक वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असुन विविध कार्यक्रम राबवुन जन जागृती करणे , शासन प्रशासनाचा योजना तळागळात ल्या नागरिका पर्यत पोचविण्याचे कार्य करीत आहे. त्यातच ११ सप्टेंबर २०२२ ला संस्थेचा ११ व्या वर्धापन दिवस निमित्य टेकडी गावात भव्य रोग निदान , रक्तदान शिबिर व ऑनलाइन आधार कार्ड, पॅन कार्ड दुरुस्ती शिबीराच्या माध्यमाने परिसरातील रूग्णांना व नागरिकांना सेवाभावी लाभ देण्यात आला . रोग निदान शिबीरात हृदयरोग , छाती संदर्भातील रोग , अस्थमा , दमा , टी. बी , पोटाचे रोग , पत्री , जलोदर , अपेंडिक्स , ब्लड प्रेशर , शुगर , स्त्री रोग , हर्निया, पंडिक्स , अपचन , लिव्हर , पिलिया आदी रोगा विषयी मार्गदर्शन , तपासणी व निशुल्क उपचार करण्यात आला .

तसेच ई-श्रम कार्ड , पॅन कार्ड , हेल्थ कार्ड , वोटिंग कार्ड , आधार कार्ड अपडेट आणि दुरूस्ती ऑनलाइन शिबीरात करून परिसरातील नागरिकांना सेवाभावी लाभ देण्यात आला. या शिबीरात ३७ रक्तदात्याने रक्तदान केले तर ७५ रुग्णांनी रोगानिदान शिबाराचा लाभ घेतला .

महल्ले मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल चे डॉ. सुमेध रामटेके एमबीबीएस , एमडी (मेडीसीन) , डॉ.पुजा मनवर एमबीबीएस , एम डी (स्कीन स्पेलीस्ट) , डॉ. महेन्द्र गुजर (एमबीबीएस, एमएस), डॉ. राखी रा.महल्ले (बीएएमएस, सीजीओ ), डॉ.राहुल मा.महल्ले  एमबीबीएस , एमडी (ए एम) इएमएस , सीसीएच , डॉ.महेक मेहता एमबीबीएस , एमएस (स्त्रिरोग तज्ञ) आदि डॉक्टरानी प्रामुख्याने उपस्थित राहुन सेवा प्रदान केली. टेकाडी ग्रामपंचायत सरपंचा सुनीता मेश्राम , लीलाधर बर्वे , शरद डोणेकर , महेश काकडे , शालिनी बर्वे , दिनेश चिमोटे ,अरूण सर्यवशी , रिंकेश चवरे , मनोज होले , शैलेश शेळकी आदी मान्यवरानी प्रामुख्याने उपस्थित राहुन सहकार्य केले . शिबीराच्या यशस्विते करिता आयोजक संस्थेचे अध्यक्ष निलेश गाढवे, केतन भिवगडे , मोहन वकलकर , नितीन बुराडे , अभिजीत चांदुरकर , अनिकेत निमजे , श्याम मस्के , मनोज लेकुळवाळे , विक्की खडाळ ,  किशोर गाडगे , राजकुमार वजेकर , प्रविण चव्हाण आदीने परिश्रम घेतले.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या