Advertisement

डब्लु सी एल टेकाडी काॅलोनी च्या मागे अज्ञात चोरट्याने केली घरफोडी

डब्लु सी एल टेकाडी काॅलोनी च्या मागे अज्ञात चोरट्याने केली घरफोडी

नगदी रुपय आणि सोन्याचे साहित्य सहित एकुण ४५ हजार रुपय केले लंपास

फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी काॅलोनी डब्लु सी एल च्या मागे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन नगदी रुपय आणि सोन्याचे साहित्य सहित एकुण ४५,००० रुपयांची घरफोडी करुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .

शहरात आणि ग्रामीण भागात मागील अनेक दिवसान पासुन चोरी , घरफोडी , मारपीट चे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असुन कन्हान पोलीस प्रशासन होणाऱ्या घटनांवर अंकुश लावण्यात आणि गुन्हेगारांना पकडण्यात अपयशी ठरल्याने पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण झाले असुन उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी प्रदिप मारोतराव विलायतकर रा.टेकाडी हे मागील १७ वर्षापासुन नागपुर ला अमेरिकन ट्राॅवर कंपनी (एटीसी) येथे टेक्नीसीयल म्हणून काम करीत असुन शनिवार दिनांक ३ सप्टेंबर ला प्रदिप विलायतकर यांची पत्नी आणि मुले हे धामनगाव जि.अमरावती येथे महालक्ष्मी कार्यक्रमात गेले होते .

प्रदिप विलायतकर हे रविवार दिनांक ११ सप्टेंबर ला दुपारी ३०० वाजता च्या दरम्यान आपल्या ड्युटीवर घराला कुलुप लावुन गेले असता दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक १२ सप्टेंबर ला सकाळी ६०० वाजता च्या दरम्यान ड्युटी वरुन घरी परत आले असता त्यांना घराचे कुलुप तुटलेले दिसल्याने घराच्या बेडरुम मध्ये असलेल्या कपाटाचे दार उघडुन पाहणी केली असता त्या मध्ये ठेवलेले नगदी अंदाजे ७,००० रुपए व गुल्लक मध्ये ठेवलेले नगदी अंदाजे ३,००० रुपए , तसेच १) कानातील सोन्याचा धातुचे डुल वजन ५ ग्राम , २) नाकातील सोन्याची नत वजन ४ ग्राम ३) सोन्याची चेन वजन ५ ग्राम ४) जुने वापरते सोन्याचे दागिने वजन १४ ग्राम असा एकुण ३५,००० आणि नगदी १०,००० रुपए असा एकुण ४५,००० रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने घरफोडी करुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रदिप विलायतकर यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४ , ४५७ , ३८० भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या