Advertisement

कांद्री येथे आज राजस्व विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन

कांद्री येथे आज राजस्व विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर आणि तहसील कार्यालय पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

नागरिकांनी , विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे तयार करून जास्तीत जास्त संख्येत शिबीराचा लाभ घ्यावा – तहसीलदार प्रशांत सांगळे यांचे आव्हान

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कांद्री येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर आणि तहसील कार्यालय पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक २३ ला सकाळी १०:३० ते ५ वाजता पर्यंत राजस्व विद्यार्थी समाधान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

गुरुवार ला शिबिर स्थळी तहसीलदार प्रशांत सांगळे , गटशिक्षणाधिकारी सौ.वंदना हटवार , ग्रामपंचायत सदस्य धनराज कारेमोरे , धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खिमेश बढिये , शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोखंडे , नायब तहसीलदार रणजित दुसावार , महिला बाल विकास अधिकारी सौ. काळे , कन्हान केंद्र प्रमुख सौ.लता मालोदे , सेतू सुविधा केंद्राचे शरद वाटकर , धर्मराज प्राथमिक शाळेचे शिक्षक  भिमराव शिंदेमेश्राम यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

आज होणाऱ्या समाधान शिबिरात जात प्रमाणपत्र , उत्पन्न प्रमाणपत्र ,अधिवास प्रमाणपत्र , आधार कार्ड दुरुस्ती व बनवणे , मतदार नोंदणी यांच्यासह विविध शासकीय कामे पूर्ण करून देण्यात येणार असल्याने कांद्री , कन्हान , पिपरी , खेडी, बोरी , निमखेडा , निलज , खंडाळा , वराडा , टेकाडी सह अनेक गावातील परिसरातील नागरिकांनी , विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे तयार करून जास्तीत जास्त संख्येत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगळे व गटशिक्षणाधिकारी सौ.वंदना हटवार , धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या