Advertisement

पिंपळगाव भोसले येथे आम आदमी पक्षाची ग्राम शाखा कमिटी गठीत

पिंपळगाव भोसले येथे आम आदमी पक्षाची ग्राम शाखा कमिटी गठीत

ब्रम्हपुरी तालुक्यात राजकारणाच्या आखाड्यात विशेष महत्वाचे गाव समजले जाणारे गाव पिंपळगाव भोसले येथे आम आदमी पक्षाचे ब्रम्हपुरी तालुका सचिव आशिष कुथे यांच्या नेतृत्वात व अध्यक्षतेखाली ग्राम शाखा कमिटी स्थापन करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजक आशिष कुथे हे होते. तालुका अध्यक्ष दिलीप प्रधान तसेच विधानसभा प्रभारी नावेद खान प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. गावातील सुजाण नागरिकांनी आम आदमी पक्षाच्या ध्येय धोरणावर आणि जनतेसाठी दिल्ली आणि पंजाब या राज्यात केलेली कामे पाहून राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यावेळी अनेकांनी आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या