उदापूर येथे गोपाळकाला व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
उदापूर येथे आज 22ऑक्टोंबरला सायंकाळी 6-30 वाजता नवयुवक गणेश मंडळ उदापूर यांचे वतीने विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी जि. प. सदस्या स्मिता राजेश पारधी, यांनी गोपाळ काल्याच्या निमित्ताने विवीध कार्यक्रम घेतल्या गेले अश्या प्रकारे कार्यक्रम घेतल्याने मुलांना वेगळी वळण मिळतो खेळाप्रती आवड निर्माण होऊन नवीन खेळाडू निर्माण होण्यास वाव मिळत असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी उदापूरचे सरपंच सोनू नाकतोडे, उपसरपंच योगेश तुपट, काँग्रेस कमेटी उदापूरचे अध्यक्ष विजय नाकतोडे, काँग्रेस कमेटी मालडोंगरी येथील अध्यक्ष तथा माजी सरपंच राजेश पारधी, व गावातील गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या