Advertisement

वेदांता फॉक्सकाँन कंपनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या आग्रहाखातर गुजरात मध्ये स्थलांतर

वेदांता फॉक्सकाँन कंपनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या आग्रहाखातर गुजरात मध्ये स्थलांतर – आप चे राज्यप्रवक्ते, जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत 

वडगाव मावळ मावळ येथील तळेगाव येथे  आम आदमी पार्टीची नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली आप पक्षाचे  राज्यप्रवक्ते जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले वेदांता फॉक्सकाँन कंपनी ही १.५ लाख कोटीची गुंतवणूक पुणे जिल्ह्यात करणार होती त्यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार होता परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या आग्रहाखातर अचानक हा प्रोजेक्ट गुजरात मध्ये स्थलांतर  करण्यात आला यावर  महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी व भाजप -शिंदे गट  एकमेकांना दोष देत आहेत.खर पाहिलं तर महाराष्ट्राने ही  कंपनी राज्यात राहावी म्हणून बऱ्याच सवलती म्हणजेच स्टॅम्प ड्युटी, जमीन, विज बिल यामध्ये घसघशीत सवलती देण्याचे ठरवले होते. परंतु ही कंपनी अचानक गुजरात मध्ये स्थलांतर करण्यात आली  ही त्यामुळे  १.२५ लाख रोजगार संधी गमावली याला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला. प्रत्यक्षामध्ये या कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणुकीस प्रथम पसंती दिली असावी असे एकूण कागदपत्रावरून वाटते. परंतु गेल्या काही दिवसापासून गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने जो धडाका लावला आहे आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे तो पाहून  गुजरात मधील सत्तेत असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

केंद्रीय सरकार वारंवार दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदियां ,  आरोग्य मंत्री जैन  यांच्यावर  खोटे आरोप लावत आहे. तर गुजरात मध्ये रोजगारावरून सामान्य जनतेमध्ये रोष निर्माण झालेला आहे.याला सामोरे जाण्यासाठी  देवेंद्र फडवणीस यांनी मोदींना गुजरातसाठीची ही भेट दिली आहे.

महाराष्ट्रात कंपनीला जरी गुंतवणूक करण्यात रस असला तरी आज भाजपला गुजरात मध्ये रोजगार निर्मितीत आलेल्या अपयशाला झाकण्यासाठी काहीतरी दाखवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे सत्ता हातात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारांचे काय व्हायचे ते होऊ दे गुजरात मध्ये मात्र निवडणुकांमध्ये फायदा व्हायला हवा. निवडणूक,सत्ता अधिक महत्त्वाची आहे. मराठी माणूस जाऊदे खड्ड्यात असं धोरण भाजप -शिंदे गटाचे असल्याने देवेंद्र यांनी नरेंद्र यांच्या आग्रहाखातर गुजरातला दिलेली ही निवडणूक रेवडी आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, जिल्ह्याचे सचिव संघटक अक्षय शिंदे, कार्याध्यक्ष निलेश वांजळे , मावळचे तालुका अध्यक्ष अमित वैद्य , प्रसिद्धी प्रमुख गणेश पवार ,सचिव सुखदेव जाधव, संघटक किरण कांबळे,तारिक कद्री, अमित पाटील, महीला अध्यक्षा शितल वर्पे,श्वेता शहा, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले व आभार आप मावळचे अध्यक्ष अमित वैद्य यांनी मानले.

प्रतिनिधी: सुखदेव जाधव, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या