Advertisement

जि.प.शाळा तोरगांव (बू.) येथील विद्यार्थिनीची गरुड झेप

जि.प.शाळा तोरगांव (बू.) येथील विद्यार्थिनीची गरुड झेप

विद्यार्थिनी जाणार आकाशवाणीवर

कोरोना काळात शाळा बंद असताना देखील अविरतपणे ज्ञानाचे कार्य करण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने खूपच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे .शाळा बाहेरील शाळा हा ‌आकाशवाणी वरील अत्यंत ज्ञानदायी उपक्रम असून तो विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे चालू आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विद्यार्थी व पालकांचा सहभाग असल्यामुळे विद्यार्थी या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतात व आवडीने व नियमितपणे कार्यक्रम बघतात 365 व्या भागाकरीता विदिशा धर्मराज रामटेके तोरगांव शाळेची विद्यार्थिनी व तिची आई कलावती धर्मराज रामटेके यांची निवड करून त्यांना सहभागाची संधी देण्यात आली आहे.

तिला मिळालेल्या सहभागामुळे शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच गावकरी अत्यंत आनंदात आहे. तिला दिलेला अभ्यास-“र’ या अक्षरापासून तयार होणारे जास्तीत जास्त शब्द बनवा. उदा. रवा” “माहित करा व सांगा.” 365, वा भाग 16 ऑक्टोंबर 2022 ला सकाळी 10:35 वाजता प्रसारित होणार आहे. त्यांच्या सहभागाबद्दल गटशिक्षणाधिकारी माणिक खुने, बीट विस्तार अधिकारी विद्या शेळके , अरविंद साखरकर ,केंद्रप्रमुख श्र गंगाधर मडावी, मुख्याध्यापक नरेश रामटेके , निपुण भारत अभियान तालुका समन्वयक फाल्गुन मेश्राम, सर्व शिक्षक व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या नागपूर विभाग प्रमुख रंजना पेंदोर मॅडम जिल्हा प्रतिनिधी विनोद ठाकरे, मंगेश ढगे व शालेय व्यवस्थापन समिती यांनी कौतुक केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या