Advertisement

कन्हान नदी वरील नवनिर्मित पुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

कन्हान नदी वरील नवनिर्मित पुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

नागरिकां मध्ये उत्साह चे वातावरण,अनेक समस्या पासुन मिळाली मुक्ती

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथील नवनिर्मित पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.
नागपुर- जबलपुर रोड वरील कन्हान येथे कन्हान नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम प्रकल्प एकुण 50.63 कोटी रूपए पेक्षा जास्त कोट्यावधी रुपयांवर बांधकाम करण्यात आले. दिडशे वर्ष पुर्ण होत असल्याने जुण्या पुलावरुन वाहतुक सुरक्षित नसून बंद करण्याचे ब्रिटिश सरकार कडून पत्र भारत सरकार ला मिळाल्याचे स्पष्ट होताच स्थानिक पत्रकारांनी जनतेला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तमान पत्रात विषय लावून धरल्याने वर्ष २०१४ मध्ये माजी रस्ते वाहतुक मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्या हस्ते नवीन पुलाचे भुमिपुजन करण्यात आले होते. 50.63 कोटी खर्च करून बांधण्यात येणारा हा पूल 390.95 मीटर लांब , ज्याच्या समोर 27.925 मीटर लांबीच्या दोन गल्ल्या सोडल्या असुन पुलाची रुंदी 14.80 मीटर असुन ज्यामध्ये दोन्ही बाजूंना दीड मीटरचा फूटपाथ सोडण्यात आला आहे.

करारानुसार पुलाचे काम २१ महिन्यांत पूर्ण करायचे होते. मात्र पुलाच्या बांधकामात वारंवार येणाऱ्या अडचणी, संथ गती मुळे होत असल्याने पुलाचे काम दुसऱ्या कंपनीला सोपविण्यात आले. त्यामुळे कामात गती आल्याने पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण होऊन एक ते दोन महिन्याचा कालावधी झाला असुन सुद्धा पुलाचे उद्घाटन कधी होईल व वाहन चालकांना, नागरिकांना कधी सुटका भेटणार या कडे नागरिकांचे लक्ष लागले होते. रेल्वे गेट मुळे वारंवार होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी व रिंकेश चवरे , युवा नेता शैलेश शेळके यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पुला बाबत चर्चा करून निवेदन सादर केले होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर विषय गांभीर्याने घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवुन कन्हान नदी नवीन पुलाचे उद्घाटनाची वेळ मागीतली असता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे आणि संबंधित विभागाच्या अधिकार्यांन सोबत चर्चा करुन पुलाचे उर्वरीत बांधकाम तात्काळ पुर्ण करण्याचे आदेश दिले व १ सप्टेंबर रोजी नवीन पुलाचे उद्घाटनाची वेळ देण्यात आली होती. अखेर गुरुवार ला कन्हान नदी वरील नवनिर्मित पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व विधान परिषद सदस्य मा. चंद्रशेखर बानवकुळे , रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाणे , रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल , कामठी विधानसभा आमदार टेकचंद सावरकर , माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे , माजी आमदार डी.मल्लीकार्जुन रेड्डी, कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडले .

या प्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक , ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , मुलचंद शिंदेकर , राजेश ठाकरे , सुनील लाडेकर , महेंद्र चव्हाण , नप गटनेता राजेंद्र शेंदरे, रिंकेश चवरे, शैलेश शेळके , विक्की सोलंकी, संजय रंगारी, सचिन वासनिक, प्रतिक वैद्य , मनोज गिरी, राहुल किरपान, सौरभ पोटभरे, ऋषभ बावनकर , संकेत चकोले , रोहित चकोले , महिला आघाड़ी शहर अध्यक्ष तुलेषा नानवटकर , सुषमा मस्के , सुनंदा दिवटे, मिना कळंबे, नगरसेविका संगीता खोब्रागडे , सुषमा चोपकर , वर्षा लोंढे , वंदना कुरडकर , चंद्रगुप्ता पानतावणे, दिपनकर गजभिये, सह आदी भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या