ब्रम्हपुरीतील युवक राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करणार मनसेत प्रवेश
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच पक्ष संघटन व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याने मनसे कार्यकर्त्यात व युवा वर्गात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका चर्चा करून व कार्यकर्त्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.
दिनांक १९, २० सप्टेंबरला राज ठाकरे चंद्रपूरला येत असून दिनांक १९ सप्टेंबर ला चंद्रपुरात मुक्काम असून २० सप्टेंबर ला कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. तिथे आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक युवक राज ठाकरे यांच्या उपस्थिती पक्षप्रवेश करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्रह्मपुरी तालुक्याचे अध्यक्ष सुरज शेंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक युवक चंद्रपूर येथील आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या उपस्थिती पक्षप्रवेश करत असल्याची माहिती व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ब्रह्मपुरी तालुक्यात स्वबळावर लढवणार असल्याची माहिती ब्रम्हपुरी तालुका मनसे अध्यक्ष सुरज शेंडे यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.


0 टिप्पण्या