Advertisement

दोन अनोळखी इसमांनी पोलीस बनावट आईडी दाखवुन अंगुठी घेऊन पसार

दोन अनोळखी इसमांनी पोलीस बनावट आईडी दाखवुन अंगुठी घेऊन पसार

फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान – शहरातील नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वरील कुलदीप मंगल कार्यालय समोर चेतन पान पॅलेस प्रतिष्ठानचा बाजुला दोन अज्ञात अनोळखी पोलीस बनावट आईडी दाखवत फसवणूक करुन ७.५ ग्राम दोन अंगुठी  किंमत ३७,५०० रु अंगठी घेऊन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी रामराव बाबुराव मानकर , रा.दिवटे लेआऊट, कळमेश्वर हे त्यांचे लहान भाऊ कृष्णराव बाबुराव मानकर रा.रामनगर, कन्हान यांचा घरी मुलाचा लग्नाचा कार्यक्रमाच्या निमित्याने कळमेश्वर वरुन सोमवार (ता.२६) रोजी सायंकाळी ५ वाजता आले. मंगळवार (ता.२७) रोजी सकाळी ९:३० वाजता च्या दरम्यान रायनगर कन्हान येथुन फिरायला बाहेर रोड वर निघाले असता राष्ट्रीय महामार्ग वरील कुलदीप मंगल कार्यालय समोर चेतन पान पॅलेस च्या बाजुला दोन रामराव मानकर यांना दोन अनोळखी इसम भेटले. त्यांनी रामराव मानकर यांना पोलीस असल्याचे सांगत, बनावट आईडी पत्र दाखविला. त्या दोन अनोळखी इसमान मधुन एकाने रामराव मानकर यांना म्हटले की, तुम्ही हातामध्ये अंगुठी घालु नका येथे चोरी होत आहे.

त्यांनी रामराव मानकर यांना अंगुठी काढण्यासाठी सांगितले . मानकर यांना काही समजण्या आधी दोन अंगुठी प्रत्येकी ७.५ ग्राम ची दोन अंगुठी एकुण किंमत ३७,५०० रु अंगुठी घेऊन दोन अनोळखी इसम पसार झाले. अंगुठी चोरी होऊन जाईन असे म्हणून विश्वासात घेऊन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी रामराव मानकर यांचा  तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विरुध्द कलम ४२०,३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या