आज कन्हान नदी वरील नवनिर्मित पुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण
नागरिकां मध्ये उत्साह चे वातावरण निर्माण
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आज कन्हान नगरीत येत असुन नागपुर- जबलपुर रोडवरील कन्हान येथे कन्हान नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम प्रकल्प एकुण 50.63 कोटी अधिक रूपयाच्या व पुलाची लांबी 415 मीटर विकास कामांचे त्यांच्या हस्ते गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 ला सांयकाळी 5:00 वाजता कन्हान ओव्हर ब्रिज कन्हान पुलाचे रस्ता आता खऱ्या अर्थाने वाहतुकीसाठी खुला होणार असून, सुसज्ज रस्त्यामुळे वेळ वाचणार आहे.


गडकरी यांच्या दौर्याच्या निमित्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रस्ता उद्घाटनाची तर भाजपची स्वागताची तयारी सुरू झाली आहे. दौर्यात गडकरी आता कोणकोणत्या कामांची घोषणा करणार तसेच नवे कोणते प्रकल्प जाहीर करणार , या कडे नागरिक आतुरतेने वाट पाहत असुन सर्वाचे लक्ष लागुन राहीले आहे.

लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभा सदस्य रामटेक कृपाल तुमाणे, विधान परिषद सदस्य अॅड. अभिजित वंजारी ,विधान परिषद सदस्य कामठी टेकचंद सावरकर, विधान परिषद सदस्य नागो गाणार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे विधान परिषद सदस्य, श्रीमती रश्मीताई बर्वे अध्यक्षा,जिल्हा परिषद, नागपुर, विधान परिषद सदस्य प्रविण दटके, आशिष जैस्वाल विधान परिषद सदस्य रामटेक, सौ.करुणाताई आष्टणकर अध्यक्षा नगर परिषद कन्हान आदी सन्मानीय मान्यवर उपस्थित राहतील.
माजी आमदार मा.डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अतुल हजारे , डॉ मनोहर पाठक , राजेंद्र शेन्दे, व्यंकटेश कारेमोरे,यांच्या नेतृत्वात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आयोजना साठी झटत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या