एस बी आय चे एटीएम मधुन ७४,००० रु. काढुन आरोपी ने केली फसवणूक
फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरातील एस बी आय चे एटीएम मधुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने फिर्यादी चा एटीएम हातचलाखीने घेवुन गेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक १८ सप्टेंबर ला सकाळी १०३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी नामे पुंडलीक केशवराव इंगोले , वय ६३ वर्ष , राहणार वार्ड क्रमांक ४ श्रीकृष्ण मंदीर जवळ टेकाडी कन्हान हे आपल्या पत्नीसह नागपुर ला जात असतांना कन्हान येथील एस बी आई चे एटीएम मधुन पैसे काढण्याकरिता गेले असता ए.टी.एम मध्ये असलेल्या अज्ञात आरोपी ने पुंडलीक इंगोले यांचा ए टी एम हातचलाखीने घेवुन गेला . पुंडलीक इंगोले यांनी बाहेर येऊन आरोपीचा शोध घेतला असता मिळुन आला नाही .
त्यानंतर पुंडलीक इंगोले यांच्या मोबाईल वर मॅसेज आला की , ‘ आपल्या खात्यातुन ७४,००० – रु . डेबीट झाले आहे . पुंडलीक इंगोले ने आपल्या पुतन्याला घटनास्थळी बोलवुन हकीकत सांगीतले असता इंगोले यांच्या पुतन्याने ए.टीएम कार्ड ब्लॉक केले . कोणीतरी अज्ञात आरोपीने हातचलाखी ने पुंडलीक इंगोले एस.बी.आय चे ए.टी.एम कार्ड घेवुन जावुन ७४,००० -रु . चे ट्रान्जेक्शन करुन एकुण ७४,००० – रु . काढुन घेत पुंडलीक इंगोले यांची फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी पुंडलीक इंगोले यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रशांत रामटेके हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .


0 टिप्पण्या