Advertisement

कशाळगाव येथे ई-पिक पाहणी ॲपचे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दाखवले प्रात्यक्षिक

कशाळगाव येथे ई-पिक पाहणी ॲपचे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दाखवले प्रात्यक्षिक

वडगाव मावळ (पुणे): येथील मावळ तालुक्यातील कशाळ येथे शेतकऱ्यांना आपापल्या शेतातील पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन पीक पाहणी करण्यात आली. भविष्यात शेतकऱ्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होण्यासाठी पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीने नोंदविणे आवश्यक आहे असे तलाठी चव्हाण सर  यांनी सांगितले. तसेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या शेतीत पिकांची नोंद, फळ झाडे , विहिरी, शेततळे, पडत असलेली जागा याची ई पीक पाहणी ॲप व्दारे नोंदणी आवश्यकच असल्याचे सर्कल अधिकारी सोनवणे सर यांनी यावेळी सांगितले.

तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध शासकीय योजना, पीकविमा, इतर फायदे घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितल.

यावेळी सर्कल अधिकारी सोनवणे सर ,  कशाळ गावचे तलाठी चव्हाण सर, कशाळ गावचे पोलीस पाटील गोरख जाधव, माजी चेअरमन धोंडू जाधव,माजी उपसरपंच सोपान जाधव,माजी अध्यक्ष शालेय शिक्षण समिती बाळासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव,नामदेव जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी मिननाथ जाधव,  माजी उपाध्यक्ष शालेय शिक्षण समितीचे अनिल जाधव, माजी तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष सुखदेव जाधव व इतर शेतकरी उपस्थित होते.यावेळी ई पीक पाहणी ची सविस्तर माहिती व प्रत्यक्षात शेतकरयांना कशाप्रकारे ॲप हाताळायचे हे दाखवण्यात आले.

प्रतिनिधी: सुखदेव जाधव ,वळगाव  मावळ-पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या