बीएसएनएल टावर चा हजारो रुययांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने केला चोरी
फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत विकास हायस्कुल ग्राउंड येथे असलेल्या बीएसएनएल टावर येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने एकुण ३७,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी नामे भुषण यशवंत घोरपडे , वय ३८ वर्ष , रा . जरीपटका नागपुर हे बीएसएनएल मध्ये नौकरी करीत असुन त्यांचे अधिकार क्षेत्रात विकास विद्यालय कन्हान चे प्रमाणित बीएसएनएल टावर येत असुन त्याची जवाबदारी भुषण घोरपडे यांचा कडे आहे .
रविवार दिनांक २७ आॅगस्ट ला रात्री ०२.०० वा ते सोमवार दिनांक २८ आॅगस्ट ला सकाळी ९ .४५ वा च्या दरम्यान अनिल पंधराम टेक्नीशियन चे साईड डाउन असल्यामुळे विकास हायस्कुल ग्राउंड येथे असलेल्या बीएसएनएल टावर जवळ आले असता त्यांना टावर चे बाहेरील लॉक तुटले दिसले . सदर घटनेची माहिती अनिल पंधराम यांनी भुषण घोरपडे यांना सांगितल्याने भुषण यांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता टावर मधील काॅम्बाइल्स ३ नग १९,२०० , स्क्रॅप व्हॅल्यु चे ६ नग किंमत १८,००० रु असा एकुण ३७,२०० रू चा मुद्देमाल दिसुन न आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी भुषण घोरपडे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .



0 टिप्पण्या