पायल विवेक कापसे वुमन अचिव्हर्स अवॉर्ड ने सन्मानित
सृश आसरा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाची कामे.
आज सोमवारला नागपूर येथे माधव बाग व सांस्कृतीक मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट सभागृहात माहेरचा कट्टा या व्यासपिठाचा राज्य स्तरीय शूभारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सिने अभिनेत्रि तेजस्विनी पंडीत यांचे हस्ते.सौ.पायल विवेक कापसे यांना त्याच्या सामाजिक ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यासाठी द वुमन अचिव्हर्स पुरस्कार उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी नागपुरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. द अचिव्हर वुमेन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. द जनऀलिस्ट असोसिएशन आणि जिवन आधार फाऊंडेशनच्या वतीने त्यांनी केलेल्या गौरवास्पद कार्याबद्दल अभिनंदन केले आहे.
चक्रधर मेश्राम दि.17/09/2022
0 टिप्पण्या