Advertisement

अंगणवाडी केंद्रात सुदृढ बालक बालिका स्पर्धा कार्यक्रम

अंगणवाडी केंद्रात सुदृढ बालक बालिका स्पर्धा कार्यक्रम

ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी येथील बाजार चौकातील समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीच्या शेजारी असलेल्या अंगणवाडी केंद्रात धूम्मनखेळा वार्ड , भवानी वार्ड , जानी वार्ड , टिळक नगर या चार अंगणवाड्याच्या संयुक्त विद्यमाने  पोषण माह अभियान अंतर्गत  सुदृढ बालक बालिका स्पर्धा कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला बाल विकास प्रकल्प अधिकारी माधुरी भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी गीता जांबोडे , आष्टेकर मॅडम, अंगणवाडी सेविका  एकता वाघाडे, पूजा ठाकरे , गीता ठाकूर , शितल राऊत व मदतनिस सह वार्डातील अंगणवाडीचे लाभार्थी बालक  उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या