Advertisement

नगराध्यक्षांचे गणेशोत्सव शुभेच्छा बॅनर अज्ञातांनी चोरले

नगराध्यक्षांचे गणेशोत्सव शुभेच्छा बॅनर अज्ञातांनी चोरले

राहुल भोयर ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर

ब्रम्हपुरी :-महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाचे शहरात आगमन झाले व अबालवृधांनी धूमधडक्यात त्यांचे स्वागत केले.शहर शिक्षण व दवाखान्यासाठी जेवढा प्रसिद्ध तेवढाच गणेश उत्सवासाठी नावलौकिक आहे. दरवर्षी प्रमाणे विघ्नहर्त्याचे आगमन मोठ्या उत्साहात झाले व नागरिकांत मोठा उत्साह दिसून आला मात्र काही अतीउत्साही समाज विघातक लोक राजकारणाने ओतप्रोत होऊन शहराचे वातावरण खराब करण्यात आपली धन्यता मानतात याचीचं प्रचिती शहराला आली असून ब्रम्हपुरीच्या नगराध्यक्षा यांनी शहरात गणेशोत्सवाच्या शुभेच्छा प्रसंगी लावलेले पोस्टर सुद्धा अज्ञात इसमांनी चोरून नेल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नगराध्यक्षा रिताताई उराडे आणि दिपकभाऊ उराडे यांनी शहरातील विविध ईतर ठिकाणी गणेश उत्सवा निमित्त गणेश भक्तांना व समस्त नागरिकांना शुभेच्छा देणारे मोठे बॅनर दोन- दिवसापूर्वी लावलेत मात्र त्यातील कुर्झा चौक, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक व ख्रिस्तानंद चौकातील बॅनर शनिवार रात्रौ सुमारास अज्ञात इसमांनी आकसाने चोरून नेले.

ईतर बॅनर ला कुणीच हात लावत नसतांना हेतूपुरस्पर फक्त नगराध्यक्षा यांचेच बॅनर चोरी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर मागील काही दिवसा पासून सुरु असलेल्या गणेश उत्साहातील आरोप – प्रत्यारोपाच्या राजकारणाने सदर बॅनर फक्त गणेश उत्सवाच्या जत्रा परिसरातूनच गायब झाल्याने विशिष्ट लोकांवर शहरातील नागरिकांचे संशय दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या