दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसर पाहणाऱ्यांना स्वताच्या डोळ्यातील मुसळ का दिसत नाहीवाऱ्याला फाशी लावण्याचे काम राजकारणी करतात तरी का
जयंत पाटील यांच्या कडे तक्रार करणाऱ्यांचा बालीशपणा समजायचा का
गडचिरोली: येथे असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात अनेकविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या सोयी- सुविधा उपलब्ध असल्याने गडचिरोली , भंडारा , चंद्रपूर जिल्ह्यासह आंध्र प्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील रूग्ण आरोग्य सेवेचा मोफत लाभ घेतात.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरू असतानाही चुकीची माहिती दिल्याने विधानसभेत ICU सुरू करण्याची मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी केली होती. रुग्णालयात रुग्णांची सेवा करण्यासाठी पर्यायी अतिदक्षता विभाग किती आहेत याची थोडीशीही माहिती नसणे हा बालीशपणा म्हणावा लागेल. कोणत्याही प्रकारचे आरोप करतांना वास्तविकता, सत्य परिस्थिती तपासून घ्यावी. वाऱ्याला फाशी लावण्याचे काम राजकारणी करतात तरी का ❓असा प्रश्न निर्माण होत आहे.
कोरोना काळात जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र आरोग्य सेवा देऊन, शर्तीचे प्रयत्न करून हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे हे विसरून चालणार नाही.
अनेक दशकापासून शासकीय सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मेहनतीच्या भरवशावर परिवारांसाठी भविष्याची तरतूद केली तर यांच्या डोळ्यात खुपते तरी का❓राजकारणात उतरून सर्वसामान्य जनतेसारखी मेहनत न करताही यांच्या पिढ्यानपिढ्या बसुन खातात तरी संपत नाही. इतकी संपत्ती येते तरी कुठून असा सर्वसामान्य नागरिकांना सहज पडणारा प्रश्न आहे.
गडचिरोली / विशेषप्र
तिनिधी दि. 4-सप्टेंबर-2022
0 टिप्पण्या