पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी तर्फे कोकणाई गड येथे ( ट्रेकिंग ) चे आयोजन
ब्रम्हपुरी – आजच्या संगणक युगात लहान मुलांना मोबाईल ,कम्प्युटर यासारख्या उपकरणांची सवय जळताना दिसते आहे ज्यातून तासंतास लहान मुले मोबाईल व कम्प्युटरला चिखटून बसलेली आपण बघतो त्यांचे शारीरिक व्यायाम होताना दिसत नाही त्यातच चायनीज फास्टफूड व अन्य तेलकट पदार्थाच्या सेवनाने शरीराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे.
ही बाब ओळखून विद्यार्थ्यांना लहान वयातच ट्रेकिंग च्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यात वावरण्याचे योग्य संधी उपलब्ध करून देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने नेहमी क्रीडा क्षेत्रात नाविद्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी तर्फे दि.१८ सप्टेंबर २०२२ रविवार ला गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम अश्या कोकणाई गड येथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध वनस्पती बद्दल माहिती व त्याचे उपयोग सांगण्यात आले तर नवेगाव बांध येथे असलेल्या जलाशयात विद्यार्थ्यांना बोटिंग चे प्रात्यक्षिक अनुभवयास मिळाले याप्रसंगी वन्य भटकंती व वनस्पती तज्ञ मा.चारुदत्त राऊत सर व
पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरी चे संचालक राहुल जुआरे सर यांच्या मार्गदर्शनात लाभले.


0 टिप्पण्या