Advertisement

जि.प.अध्यक्ष सौ.रश्मी बर्वे यांनी पशु पालकांचा गोठ्यावर जाऊन दिली भेट

जि.प.अध्यक्ष सौ.रश्मी बर्वे यांनी पशु पालकांचा गोठ्यावर जाऊन दिली भेट

रोगा विषयी जनजागृती करण्याचे आणि तातडीने गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्याचे रश्मी बर्वे यांचे प्रशासन व अधिकार्यांना आदेश

पशुपालकांनी नियमांचे पालन करावे –  जि.प.अध्यक्ष सौ.रश्मी बर्वे यांचे आव्हाहन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरातील कांन्द्री गावा मध्ये गाय बैलांवर आलेल्या लंपी आजारा विषयी माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रश्मी श्यामकुमार बर्वे यांनी पशुचिकित्सक यांची चमू घेऊन दौरा केला व आलेल्या रोगाविषयी जनजागृती करण्याचे निर्देश ग्रामपंचायत प्रशासनाला दिले व तातडीने गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्याचे निर्देश पशुचिकित्सक चमुला दिले असुश आलेल्या रोगाविषयी पशुपालकांनी घाबरून न जाता दिलेल्या नियमांचे पालन करावे असे कडकडीचे आव्हाहन जि.प.अध्यक्ष सौ.रश्मी बर्वे यांनी केले .

या प्रसंगी पंचायत समिति पारशिवनी सभापती सौ.मीना कावळे , धनराज कारेमोरे , बैसाखू जनबंधु , प्रकाश चाफले , शिवाजी चकोले , महेश झोडावणे , चंद्रशेखर बावनकुळे , राहुल टेकाम , सदस्या सौ.आशा कनोजे , दुर्गा सरोदे , रेखा शिंगणे , विभा पोटभरे , वर्षा खडसे , दिनकर इंगळे(ग्रा.वि.अधिकारी)

राजू देशमुख , वसंतराव लोहकरे ,गणेश सरोदे , गोपाल मस्के , अभय जांबूतकर , निकेश मेश्राम , संदीप सरोदे , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या