महसूल विभागाद्वारे सुरबोडी इथे सेवा पंधरवाडा कार्यक्रम साजरा
ब्रम्हपुरी-तालुक्यातील सुरबोडी गाव येथे सेवा पंधरवाडा कार्यक्रम राणी मंडळ नवरगाव च्या वतीने नागरिकांच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हावे त्यांना तात्काळ दाखले मिळावे त्यांचे रखडलेले काम या शिबिरामधून व्हावे या उद्देशाने ग्रामपंचायत कार्यालय सुरबोडी येथे पिंपळगाव, सोंद्री, चिखलगाव, लाडज, हरदोली ,सोनेगाव, सावलगाव,चिंचोली, या गावातील बरेच शेतकरी बांधव महिला व पुरुष आले होते.
सातबारा, नमुना आठ, उत्पन्नाचे दाखले अल्पभूधारकाचे दाखले त्याचप्रमाणे अन्न व पुरवठा विभागाद्वारे नवीन राशन कार्ड काढणे, फाटलेल्या राशन कार्ड ऐवजी नवीन राशन कार्ड बनवणे,नवीन नावाची नोंद करणे इत्यादी कामे करण्यात आले, त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी योजना कौटुंबिक अर्थसाह्य योजना, विधवा,अपंग निराश्रीत, लोकांसाठी योजना याकरिता मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.
या कार्यक्रमासाठी तहसीलदार उषा चौधरी यांनी नागरिकांना विविध योजना समजावून सांगितले तसेच शिबिरात लोकांना तात्काळ दाखल्याचे वाटप केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पी.जी.एरमे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता तलाठी भावना निमजे तलाठी पिंपळगाव ,अर्चना सेलोकर , तलाठी अमित मूल चिखलगाव राजेश अकोजवार ,तलाठी नान्होरी, हिमांशू पाजनकर तलाठी तोरगाव (बु),महसूल सहाय्यक ताराचंद राऊत अन्न पुरवठा शाखा, दिलीप मेश्राम तसेच कोतवाल अमित मेश्राम, राजेंद्र गजभिये, शरद ढोक सरपंच सुरबोडी, राधिका बावनकुळे सरपंच सावलगाव, पौर्णिमा पचारे तसेच सभोवतालचे शेतकरी व महिला वृद्ध मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी आले होते.
Rahul bhoyar,bramhpuri-Chandrapur



0 टिप्पण्या