Advertisement

कांद्री येथील जय शीतला माता मंदिरात नवरात्रोत्सवाची थाटात सुरुवात

कांद्री येथील जय शीतला माता मंदिरात नवरात्रोत्सवाची थाटात सुरुवात

कन्हान – शहरातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील कांद्री-कन्हान येथील जय शीतला माता मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त सोमवारी दुपारी मान्यवरांचा आणि जय शितला माता मंदिर कमेटी सदस्यगण यांच्या हस्ते मातेचे अभिषेक , विधिवत पूजा , अर्चना , घटस्थापना , आरती करुन भाविकांनी आनंद घेत नवरात्र महोत्सवाची थाटात सुरुवात करण्यात आली .

या प्रसंगी उषा मरघडे,कीर्ती हटवार,कमला खैरकर,डॉ. भाविका मंगतानी,अरुणा हजारे, लता बावनकुळे,विभा पोटभरे, मीना पाल,हंसाबेन पटेल, बेबीनंदा राऊत,आशा गुरव,रक्षक ताई,पानतावणे ताई,डॉ.अनिल मंगतानी,प्रकाश ढोके,वसंता राऊत,अशोक खैरकर,सुरेश अंबागडे,बादल विश्वकर्मा,किशोर बावणे,चंद्रशेखर बावनकुळे, पियुष राजनकर,हिमांशू हटवार आदि भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित होते .

या नवरात्र महोत्सव निमित्य जय शितला माता मंदिरात सतत ९ दिवस सकाळ व संध्याकाळ आरती सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .

दररोज मंदिरात भजन कीर्तन कार्यक्रम सुरु असुन सोमवार दि.३ आॅक्टोबर ला दुपारी २ वाजता हवनपुजा पाठ , सायंकाळी ४:३० वार्ता कन्यापुजन , आणि ६:०० ते १०:०० पर्यंत भव्य महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले असुन मंगळवार दि.४ आॅक्टोबर ला सायंकाळी ७:३० वाजता घट विर्सजन करुन नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे . या सर्व कार्यक्रमात सर्व भाविक भक्तींनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे असे कडकडीचे आव्हाहन संजय चौकसे , वामन देशमुख , दिलीप मरघडे , चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे .

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संजय चौकसे , दिलीप मरघडे , वामन देशमुख , चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाविक भक्त अधिक परिश्रम करीत आहेत .

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या