Advertisement

हत्या प्रकारणातील आरोपी सहा महिने लोटूनही मोकाटच

हत्या प्रकारणातील आरोपी सहा महिने लोटूनही मोकाटच

बेटाळा येथील विष्णू दिवदे याचा संशयास्पद मृत्यू: पोलिस विभागांचे घटनेकडे दुर्लक्ष

तालुक्यातील बेटाळा येथील धान्यव्यापारी विष्णू लालाजी दिवटे याचा संशयास्पद मृतदेह त्याच्या धान्यः गोदाममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती .
सदर घटना दि . २१ मार्च २०२२ रोजी उघडीस आली मात्र सहा महिने लोटूनही आरोपीला पकडण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नसल्याने पोलीस विभाग काय ? करीत आहे . असे प्रश्न निर्माण झाले आहे.आमच्या प्रकरणाकडे पोलीस विभागाचे पूर्ण पणे दुर्लक्ष करीत आहेत व उलट – सुलट प्रश्न विचारून आमच्या परिवाराला त्रास देण्याचे काम करीत आहेत .

आरोपी पकडण्यात पोलीस विभाग कुठे तरी कमी पडले आहेत , असा आरोप पत्रकार परिषदेत देवचंद्र दिवटे यांनी केला . गावलागतच पारडगाव – बेटाळा रोडवर मृतक विष्णू दिवठे यांचे धान्य गोदाम आहे .20 मार्च रोजी गावात नाटकाचे आयोजन केले होते. तो नाटकाचा कार्यक्रम माझ्या वडिलांनी स्वखर्चातून आयोजित केला होता . बऱ्याच वेळ पर्यंत मृतक त्या नाटकात उपस्थित होते . मात्र माध्यरात्रीनंतर मृतक विष्णू दिवटे तिथे दिसून आले नाही . त्याच सकाळी सदर घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच घटनेची माहिती त्यांचा मुलगा देवचंद दिवटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . त्यानुसार ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करीत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले .

सदर प्रेतावर रक्तस्त्राव व जखमा आढळून आल्याने पोलीस विभागाने घात – पात असल्याची शक्यता वर्तविली असून बेटाळा गावातील काही संशयित नागरिकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती . पोलीस विभागाने कसून चौकशी केल्यानंतरही सहा महिने लोटून सुद्धा आरोपीचा शोध लागता लागेना . सदर हत्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलीस विभागाची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे .

सदर प्रकरण संदर्भात उपविभागीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मूल, येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे ब्रम्हपुरी, पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक रोशन यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुंभारे , पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे , व अन्य पोलीस विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून गावामध्ये चोख बंदोबस्त लावण्यात आला होता . मात्र अद्याप आरोपीला पकडण्यात पोलीस विभागाला यश आले नाही . उलट आमच्या परिवाराला त्रास देण्याचे काम करीत आहेत . आरोपीचा शोध लवकरात लवकर लावाव. अन्यथा मी व माझा परिवार उपोषण करीत असे पत्रकार परिषदेत मुलगा देवचंद्र दिवटे यांनी सांगितले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या