Advertisement

एकाच परिवारातील चौघांनी वीस प्राशन करून केली सामूहिक आत्महत्या! यात महिलेचा मृत्यू

एकाच परिवारातील चौघांनी  वीस प्राशन करून केली सामूहिक आत्महत्या! यात महिलेचा मृत्यू

ब्रह्मपुरी ब्रम्हपुरी येथे अर्जन्विस म्हणुन काम करीत असलेले ठाकरे व त्यांच्या कुटुंबातील मुलांसह  सर्वच व्यक्तीनी विश प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामध्ये  रमाकांत ठाकरे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून दोन मुले गंभीर असुन रमाकांत ठाकरे हे सुद्धा अत्यंत गंभीर अवस्थेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार वडील रमाकांत ठाकरे हे मुलांना नोकरी लागत नसल्यामुळे घरात नेहमी भांडण सुरू असायचे त्यामूळे वातावरण नीट राहत नव्हता . परिस्थिती बेताची असल्याने नेहमीच पैशाची अडसर भासायची  अश्या परिस्थितीतून  यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती  समोर येत आहे.

गीता ठाकरे यांचा मृत्यू झाला असून त्यांचा शव ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास आणले आहे.

तर  रमाकांत दामोदर ठाकरे 53 राहुल रमाकांत ठाकरे  27 मनोज रमाकांत ठाकरे वय 26 यांची प्रकृती गंभीर असून त्यांना गडचिरोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या