वडगाव- कातवी मधील सर्व नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड मोरया महिला प्रतिष्ठानचा सुप्त उपक्रम
वडगाव मावळ (पुणे):मोरया महिला प्रतिष्ठान व मोरया ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथे
मोफत आधार कार्ड अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे,नगरसेविका पुनम जाधव, कार्याध्यक्षा चेतना ढोरे, यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मोफत आधार कार्ड उपक्रम वडगाव – कातवीतील सर्व नागरिकांसाठी आहे. राजमुद्रा मार्ट शेजारील नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे जनसंपर्क कार्यालयात आहे. आधार केंद्रात भेट देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केले.
यावेळी मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे,नगरसेविका पुनम जाधव, कार्याध्यक्षा चेतना ढोरे, यशवंत शिंदे, चेतन ढोरे आदी नागरिक उपस्थित होते.
प्रतिनिधी: सुखदेव जाधव, पुणे
0 टिप्पण्या