Advertisement

आमडी गट ग्रामपंचायत अंतर्गत हिवरी गावामध्ये विविध उपक्रम:सरपंच शुभांगी भोस्कर

आमडी गट ग्रामपंचायत अंतर्गत हिवरी गावामध्ये विविध उपक्रम:सरपंच शुभांगी भोस्कर

दिनांक २२९२०२२ ला आमडी गट ग्रामपंचायत अंतर्गत हिवरी गावामध्ये कार्यालय पारशिवनी भुमिअधिक्षक भुमि अभीलेख चा वतीने महाराष्ट्र शासनाची  भुमि अभिलेख विभाग महास्वामीत्व योजना सनद (पट्टे) वितरण शिबीराचा आयोजन करण्यात आले.या शिबीरामध्ये हिवरी गावाती गावठाना मधील घर मालकांनाचा घराचे पट्टे आमडी सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांचा हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पारशिवनी भुमि अभीलेख कार्यालयाचे श्री रायपुरे साहेब यांनी सनद पट्टे चा महत्व व फायदे सांगीतले.याप्रसंगी हिवरी गावतील घर पट्टे मालक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

महाराष्ट्र शासनाचा दिशा निर्देशा प्रमाणे प्लॉस्टीक मुक्त गाव करर्ण्याचा उद्देशाने आमडी गावात प्लॉस्टीक कचरा संकलन घर ची स्थापना आमडी सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांनी पुजन करून प्लॉस्टीक कचरा संकलन घर स्थाई लावण्यात आले. या प्रसंगी सरपंच व सचीव मोरे  यांनी आमडी गावातील नाग्रीकांना प्लॉस्टीक उघड्यावर न टाकता कचरा संकलन मध्ये टाकण्याची सुचना दिली. यावेळी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या