Advertisement

कन्हान नगर परिषद अंतर्गत औद्योगिक विकास महामंडळ द्वारे नविन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्यासाठी जागेची पाहणी

कन्हान नगर परिषद अंतर्गत औद्योगिक विकास महामंडळ द्वारे नविन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्यासाठी जागेची पाहणी

कन्हान/पारशिवनी: दि.१६-सप्टेंबर-२२ रोजी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांनी नविन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्यासाठी तालुका पारशिवनी येथिल, कन्हान नगर परिषद अंतर्गत जागेची पाहणी केली. यावेळी  अँड.आशिषजी जयस्वाल (आमदार-रामटेक विधानसभा ५९) प्रमुख उपस्थितीत व प्रमुख मर्गदर्शनात जागेची पाहणी केली.

दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी श्री.उदयजी सामंत उद्योग मंञी यांच्या कार्यालय मध्ये रामटेक व कन्हान(ता. पारशिवनी) येथे नवीन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्याबाबत बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्य सचिव-उद्योग विभाग, सह सचिव-उद्योग विभाग,मुख्य कार्यकारी अधिकारी-म.औ.वि.म.मुंबई, एम.पटेल प्रादेशिक अधिकारी,म.औ.वि.म.नागपूर इथे प्रामुख्यानी उपस्थित होते.

सांगितले जाते कि रामटेक व पारशिवनी तालूक्यात जंगल व्याप्त परिसर असल्यामूळे पूर्वीपासूनच उद्योगांना पुरेसा वाव मिळाला नाही. यामूळे औद्योगिक प्रगती झाली नाही. त्या कारणाने बेरोजगारी, लोकांचे रोजगारासाठी पलायन या सर्व प्रश्नांना! उत्तर म्हणून नविन औद्योगिक क्षेञ निर्माण करुन तो विकसित करण्याची नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती. त्याच मागणीला धरुन रामटेक विधानसभा क्षेञाचे आमदार अँड.आशिषजी जयस्वाल यांनी पाठपुरावा करुन हा प्रश्न शासन दरबारी खंभीर धरून ठेवला होता. मागील अडीज वर्षात सत्तेचे व कोरोना मुळे राज्याचे जे हाल झाले हे जनतेला माहीच आहे. असेही माहितीस समोर आले आहे.

मागील शासनाने हा प्रस्ताव थंड बसत्यात टाकला होता व प्रस्ताव अव्यवहारिक असल्याचे सांगितले होते. परंतु रामटेक विधानसभा आमदार आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारनि, उद्योग मंञी-उदयजी सामंत, यांनी परत ह्या विषयाची शहानिशा करण्यासाठी दोन दिवसात सर्वे करुन संक्षिप्त  टिपणी सादर करण्याबाबत प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,मुंबई यांना आदेश दिले होते.

शुक्रवार दिनांक १६-सप्टेंबर-२०२२ रोजी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, नविन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्यासाठी रामटेक व पारशिवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद येथिल जागेची पाहणी करण्या करिता रामटेक विधानसभा आमदार-आशिष जयस्वाल, वर्धराज पिल्ले (शिवसेना उपजिल्हा-प्रमुख), कन्हान नगर परिषद नगराध्यक्षा- करूणा आष्टनकर, नगर सेवक-डयानील शेंडे, निक्कू पिल्ले, गौरव पनवेलकर, अजय मोरे, (मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई), एम पटेलजी (प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.महामंडळ,नागपूर), कुलकर्णी, जोगवे (कार्यकारी अभियंता(म.औ.वि. महामंडळ,नागपूर), ह्यावेळेस  इत्यादिंनी प्रमुख उपस्थित दर्शविली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या