Advertisement

रणमोचन येथे ११ ऑक्टोबरला भव्य विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा

रणमोचन येथे ११ ऑक्टोबरला भव्य विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा..

ब्रह्मपुरी: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन(खरकाडा) येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ (नवीन आबादी) यांच्या वतीने ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक ११ ऑक्टोंबर २०२२ रोजी मंगळवारला सायंकाळी ७:३० वाजता पुरुष व महिला मंडळी साठी भव्य विदर्भ स्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पुरुष गटासाठी स्पर्धेचे पहिले बक्षीस ११ हजार रुपये दुसरे बक्षीस ९ हजार रुपये तिसरे बक्षीस ७ हजार रुपये चौवथे बक्षीस ५ हजार रुपये. पाचवे बक्षीस ३ हजार रुपये सहावे बक्षीस २ हजार रुपये सातवे बक्षीस १ हजार रुपये देण्यात येणार आहे तर महिलांसाठी पहिले बक्षीस ५ हजार रुपये दुसरे बक्षीस ३ हजार रुपये तर तिसरे बक्षीस २ हजार रुपये देण्यात येणार आहे भजन स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडणार असून अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या भजन स्पर्धेमध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन रणमोचन येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या