चंद्रपूरात अनेक युवकांचा आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश
शुक्रवार ला आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे युवा संवाद कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहा मध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद आम आदमी पार्टी चंद्रपूर चे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी भुषवले. या कार्यक्रमा साठी दिल्ली वरून आलेले प्रमुख पाहुणे विमलेश कोलि मॅडम तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य अबिद खान,महाराष्ट्र युथ अध्यक्ष अजिंक्य शिंदे , युथ संघटन मंत्री संदीप सोनवणे तसेच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे , जिल्हा सचिव संतोष दोरखंडे ,जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी होते.
या कार्यक्रम आयोजित करण्याचं मुख्य कारण म्हणजे युवा जागृती होय .. देशाचं राजकारण ,देशाचं समाजकारण,देशाचं अर्थ कारण युवाच बदलवू शकते..या करिता युवकांनी समोर यावे तसेच देशात सुरु असलेल्या अंध,मुख बधिर सरकारचि झोप उडवावि ..देश स्वातंत्र्य होऊन बरेच वर्ष उलटली परंतु देशात अजूनही जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. नागरिकांना पाच गोष्टींची अत्यंत गरज आहे ती
१.दर्जेदार मोफत शिक्षण, २.मोफत वीज, ३.मोफत आरोग्य सोई, ४.मोफत शुद्ध पाणी, ५.सर्वाना रोजगार.
दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या सर्व सोई मोफत करत आहेत . युवकांना त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन मोठे संघटन निर्माण करावं लागेल असे मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
0 टिप्पण्या