नेहा प्राथमिक शाळेच्या वतीने सन्मान तिरंगा जनजागृती रॅली
कन्हान – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहा प्राथमिक शाळेच्या वतीने सन्मान तिरंगा जनजागृती रॅली वाघधरे वाडी कन्हान नगरात काढण्यात आली.
नेहा प्राथमिक शाळेच्या वर्ग पहिले ते पाचवीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेत भारत माता की जय चा जयघोष करीत जनजागृती रॅली काढली.
या रॅलीला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रेमलाल रोडेकर व मुख्याध्यापक श्री गणेश खोब्रागडे यांनी हिरवा झेंडा दाखविला. अत्यंत शिस्तबद्ध रितीने चिमुकल्यांनी भारत माता की जय, हर घर तिरंगा, तिरंगे की रक्षा कोन करेंगा हम करेंगे हम करेंगे या घोषणा देत कन्हान गावात प्रभातफेरी काढली. यावेळी मुख्याध्यापक गणेश खोब्रागडे यांनी घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन पालकांना केले.
यावेळी आशा वर्कर सारीका धारगावे, अंगणवाडी सेविका प्रमिला रंगारी, अंगणवाडी मदतनीस शालू मिसार यांच्यासह मोठय़ा संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. जनजागृती रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सुनिता तांदूळकर, मंगला पाहुणे, वनिता घोडेस्वार,यांनी सहकार्य केले.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर



0 टिप्पण्या