Advertisement

मुरलीधर मंदिर जन्माष्टमी साजरी

मुरलीधर मंदिर जन्माष्टमी साजरी

दिनांक 19 ऑगस्ट ला श्री मुरलीधर मंदिर टिळक नगर ब्रम्हपुरी येथे जन्माष्टमी साजरी करण्यात आली  कार्यक्रमाची सुरुवात ह. भ. प. हिरालाल येलतूरे महाराज व त्यांच्या भजन संचाद्वारे सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम व नंतर गोपाळ काल्याच्या महत्वावर ह. भ. प. बाळकृष्ण तलमले महाराज नॅनोरी यांचे कीर्तन झाले.

त्यानंतर ज्ञानेश्वरी गुदार्थ, दीपिका ग्रंथाचे पारायण सामुदायिक प्रार्थना जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करून प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा महिला मंडळ, पुरुष बचत गट, भजन मंडळ शेष नगर, राजू  शालीग्राम हनुमान वार्ड देसाईगंज यांचे मोलाचे सहकार्य लाभले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या