पुराने वेढलाय ग्रामीण भाग – निष्क्रिय वैद्यकीय अधिकाऱ्यांना नाही जाग
ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत काही तरुणांनी वाढदिवसाच्या पार्टीचे केलेलं आयोजन अलीकडेच चर्चेत आलं असतांना आणखी एक धक्कादायक बाब लक्षात आली ती मुडझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यालयी नसणारे वैद्यकीय अधिकारी व पुरात वाहून जाणारी आरोग्य व्यवस्थेची लक्तरे.!
गोसेखुर्द धरणातून झालेल्या जल विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आलेला आहे व ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे हे सर्वश्रुत आहे.!
अशा पूरपरिस्थितीमध्ये मुडझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यालयी एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब दलित, आदिवासी जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.!
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत आरोग्य केंद्रातील पारिचारिका भगिनींवर रुग्णांची तपासणी करण्याची जबाबदारी येऊन पडलेली आहे.!
पावसाळ्यात तसेही सर्वदूर साथीच्या रोगांचे थैमान असतेच, त्यात एक महिन्यांपूर्वी व आत्ताच्या पुराने हिवताप, डेंग्यू, विषमज्वर, कावीळ अशा अनेक रोगांचे सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर आक्रमण झालेलं आहे, त्यातच वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी नसल्याने रात्री बेरात्री अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे काय.? असा प्रश्न नागरिकांना पडलाय.! जर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी, अहंकारी व बेजबाबदार वर्तणुकीमुळे उद्या एखाद्या निष्पाप जीवाचं काही बरं वाईट झाल्यास नागरिक उग्र रूप धारण करतील व अशा प्रसंगी त्यास संपूर्णपणे तालुका व जिल्हास्तरावरील आरोग्य अधिकारी जबाबदार असतील अशी संतप्त भावना मुडझा व आजूबाजूच्या गावकरी मंडळींनी व्यक्त केली आहे.!


0 टिप्पण्या