स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर हर घर तिरंगा उपक्रम साजरा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर हर घर तिरंगा उपक्रम साजरा करण्याचा केंद्र सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत ब्रह्मपुरी शहरात तसेच तालुक्यातील गावागावात तिरंगा घरोघरी लावण्यात आले.
तिरंगाचा हा उपक्रम राबविण्या करिता विशेषतः बालकांनी मोठ्या संख्येने आग्रह करून आपल्या घरी तिरंगा लावला. अशाच प्रकारचा उपक्रम राबवत असताना ब्रह्मपुरी शहरातील टिळक नगर येथील निर्मित भोयर यांला सुद्धा तिरंगाचा मोह आवरता आला नाही व त्यांने आपल्या घरी तिरंगा मोठ्या अभिमानाने लावला व तिरंग्याला त्याने मानवंदना दिली.
हर घर तिरंगा हा उपक्रम खरंच स्तुत्य उपक्रम आहे यामुळे आपल्या मध्ये देश प्रेम जागृत होत असतो.
दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला तहसील कार्यालय येथे तिरंगा फडकविला जातो. त्या तिरंग्याला मानवंदना देण्याकरिता मोठ्या संख्येने नागरिक व तरुण उपस्थित असतात.


0 टिप्पण्या