Advertisement

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त ब्रम्हपुरी सायकल क्लबच्या वतीने जनजागृती रॅलीचे यशस्वी आयोजन.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त ब्रम्हपुरी सायकल क्लबच्या वतीने जनजागृती रॅलीचे यशस्वी आयोजन.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सायकल क्लब ब्रह्मपुरी, नगरपरिषद ब्रम्हपुरी व पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी तर्फे भव्य जनजागृती सायकल रॅली चे यशस्वी आयोजन १४ ऑगस्ट रविवारला सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रम्हपुरी येथे करण्यात आले होते.

या भव्य सायकल रॅली मध्ये ब्रम्हपुरी नगरपरिषद प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले यात शहरातील संपूर्ण नगरपरिषद लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी पावसाच्या सरी सुरु असतांना सहभागी झालेत तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला प्रामुख्याने आर्शिया जुही मुख्याधिकारी न.प. ब्रम्हपुरी, रोशन यादव ठाणेदार ब्रम्हपुरी, रिताताई उराडे,  रेशमिताई पेशने प्रामुख्याने उपस्थित होते.

सायकल रॅलीची शेवट सामूहिक वंदे मातरम गीताने करण्यात आली.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुयोग बाळबुधे  यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.विशाल लोखंडे, सुधाकर मेश्राम, डॉ. बिंजवे, स्वप्नील अलगदवे, प्रवीण राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या