Advertisement

कन्हान परिसरात बैल पोळा सण मोठ्या उत्साहात थाटात साजरा

कन्हान परिसरात बैल पोळा सण मोठ्या उत्साहात थाटात साजरा

विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन बैलांची केली पुजा अर्चना

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात व परिसरात ह्या वर्षी दोन दिवसीय पोळा सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन विविध गावात बैल व तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन करुन बैलांची पुजा अर्चना करुन व लहान मुलांना खाद्यपदार्थ स्टेशनरी सामग्री वाटप करुन पोळा सण साजरा करण्यात आला .

कांद्री येथे हनुमान मंदिर परिसरात बैलपोळा कार्यक्रम संपन्न

कांद्री येथे हनुमान मंदिर परिसरात बैलपोळा कार्यक्रम संपन्न

कांद्री येथे हनुमान मंदिर परिसरात बैलपोळा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात वीस ते तीस बैलजोड्या उपस्थित होत्या . यावेळी कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे , उपसरपंच श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे , सदस्य शिवाजी चकोले , चंद्रशेखर बावनकुळे , सदस्या अरुणा हजारे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष नरेश पोटभरे सह आदि महिलांनी , नागरिकांनी बैलांची पुजा अर्चना करुन बैलपोळा उत्सव साजरा करण्यात आला . या प्रसंगी गणेश सरोदे , वामन देशमुख , भगवान सावरकर , गुरुदेव चकोले , सौरभ पोटभरे , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टेकाडी हनुमान मंदिर चौकात बैलपोळा कार्यक्रम संपन्न

टेकाडी हनुमान मंदिर चौकात बैलपोळा कार्यक्रम संपन्न

टेकाडी हनुमान मंदिर चौक संकुलात बैल पोळा कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या थाटात संपन्न करण्यात आले . कार्यक्रमात शेतकरी सुरेश खोरे , अशोक वासाडे , चिरकुट हुड , सुरेश मोहाडे , महादेव सातपैसे , ईश्वर टाकळखेड यांनी त्यांना आपल्यासाठी देवापेक्षा वरचे मानले . बैलांना वधू प्रमाणे सजवण्यात आले , नंतर मंदिरासमोर उभे करुन त्यांची नागरिकां द्वारे विधिवत पूजा करण्यात आली , त्यानंतर दोन्ही बाजूंनी मोठ्या आवाजात काव्य गायन करण्यात आले गावातील कोतवालने सर्व जोड्यांवर मशाल लावली नंतर तोरण खांबाला तोडून संपवले व सुंदर जोडप्याला बक्षिसे व भेटवस्तू देण्यात आले यावेळी मनोज लेकुरवाडे , अमित वासाडे , रमेश बालपांडे , मनोज बोराडे , नंदू लेकुरवाडे , सतीश घारड , योगेश सावरकर , सचिन भोयर , विशाधर कामडे , हेमत राऊत यांनी सहकार्य केले .

 येसंबा गावात बैलपोळा कार्यक्रम संपन्न

येसंबा गावात बैलपोळा कार्यक्रम संपन्न

येसंबा गावा मध्ये बळीराजा सर्वात मोठा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित येसंबा ग्रामपंचायत सरपंच धनराज हारोडे यांनी , महिलांनी , नागरिकांनी बैलांची विधिवत पूजा अर्चना करून व प्रसाद वाटप करुन बैलपोळा कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .

या प्रसंगी येसंबा ग्रामपंचायत सरपंच धनराज हारोडे , उपसरपंच रविन्द्र बांगडे , ग्रामपंचायत सदस्य , सदस्या , कर्मचारी सह गावातील प्रतिष्ठीत नागरिक ,युवा वर्ग आणि बालगोपाल मोठ्या संख्येत उपस्थित होते .

तसेच परिसरात निलज , खंडाळा , वराडा पिपरी सह अनेक ठिकाणी बैल पोळा सण उत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या