Advertisement

कुर्झा चौक-अर्हेर नवरगाव रस्ता दुरूस्त करा !आम आदमी पक्षाचे निवेदन

कुर्झा चौक-अर्हेर नवरगाव रस्ता दुरूस्त करा !आम आदमी पक्षाचे निवेदन

कुर्झा कॉर्नर ब्रह्मपुरी ते अर्हेर नवरगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या मार्गाद्वारे आवागमन करणाऱ्या वाहनांना आणि वाहतुकदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . या मार्गाद्वारे शाळा आणि महाविद्यालयात मोठ्याप्रमाणात विद्यार्थी ब्रह्मपुरीत शिक्षणासाठी येतात . तसेच ब्रह्मपुरी परिसरातील गावांसाठी मोठी बाजारपेठ तसेच सरकारी कार्यालये , आरोग्य सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणावर या मार्गाने नागरिक ये – जा करतात

परंतु , रस्त्याखराब असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन यावे लागत आहे. मागील काही दिवसांत नदीघाटावरील वाळूची वाहतूक करणाऱ्या तसेच या मार्गावर असलेल्या अनेक राईस मिल पोहा मिलमधून मालाची वाहतूक करणारे ओव्हरलोड ट्रक , ट्रॅक्टर्स इतर वाहनांमुळे या मार्गाची दुरवस्था झालेली आहे .

या मार्गावरून ये – जा करणे म्हणजे मुठीत जीव घेऊन प्रवास करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे . या मार्गावरून प्रवास करताना शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी , वृद्ध किंवा रुग्णांचा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे . याविषयी अनेकदा कुर्झा वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाकडे अर्ज केला आहे .

तसेच ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि बांधकाम सभापती याच प्रभागातील असून आजपर्यंत या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष झाले आहे . म्हणून प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन या छिन्न – विच्छिन्न झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे , या मागणीसाठी आम आदमी पक्ष ब्रम्हपुरी द्वारे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले .

प्रशासनाला दिला अल्टिमेटम

या समस्येला गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास आम आदमी पक्षातर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाद्वारे देण्यात आला आहे . यावेळी विधानसभा प्रभारी नावेद खान , राहुल सोनटक्के , दिलीप प्रधान , आशीष कुथे , आशू हुमने , भास्कर तुपट , उत्पल नागदेवते व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या